लक्ष्मीदहिवडी पंचायत समिती गणासाठी संजय पवार यांना जोरदार पसंती

Rajkumar Sarole
3 Min Read

सोलापूर : मंगळवेढा तालुक्यात दुष्काळी भागात असलेल्या लक्ष्मीदहिवडी जिल्हा परिषद गट अंतर्गत लक्ष्मीदहिवडी पंचायत समिती गटाचे नेते माजी पंचायत समिती सदस्य, त्याचबरोबर श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक, घरनिकी गावचे माजी सरपंच अशा अनेक पदांवर काम केलेले विकासरत्न संजय पवार यांच्या नावाला परिसरातील नागरिकांनी पुन्हा जोरदार पसंती दिली आहे.

मंगळवेढा तालुक्याच्या पंचक्रोशीतील अनेक गोरगरीब शेतकरी, नोकरदार सर्व क्षेत्रातील लोकांशी दांडगा जनसंपर्क असलेलं लोकाभिमुख व लोकांच्या मनातील नेतृत्व म्हणजेच संजय पवार अर्थात भाऊसाहेब हे  होय. गेली चार दशक आवताडे परिवाराचे एकनिष्ठ असलेले संजय पवार हे शेती क्षेत्र असो ,पंचायत समिती कृषी विभाग,मार्केट कमिटी, साखर कारखाने, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग,बांधकाम विभाग सर्व क्षेत्रातील अभ्यासू नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. मुद्देसूद व अतिशय अचूक आणि खोलातील ज्ञान व माहिती,कार्यालयीन कामकाजाचे ज्ञान असलेला हा जनसामान्याच्या मनातील माणूस. लोकांच्या सेवेसाठी सदैव 24 तास उपलब्ध असणारा नेता म्हणून ख्याती आहे. हे अष्टपैलू नेतृत्व माण नदीकाच्या लोकांचे अशास्थान आहे. माण नदीचा पाण्याचा प्रश्न असो, कॅनलला पाणी सोडण्यासाठी उजनीच्या पाण्यासाठी पाठपुरावा करायचा असेल,रस्ते विकास असेल, वीज पुरवठ्याच्याबाबतीत शेतकऱ्यांच्या असलेल्या समस्यांचा पाठपुरावा करणारे नेतृत्व म्हणजे संजय पवार. त्याचबरोबर कृषी विभागाकडून लोकांना आर्थिक मदत किंवा शेती उपयोगी साहित्य उपलब्ध करून देणे असेल किंवा पंचायत समितीच्या असलेल्या सर्व योजना तळागाळापर्यंत पोहोचण्याच्या कामी त्याचबरोबर घरकुल योजना सर्व गोरगरीब लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवून सर्वांना शासनाच्या सर्व योजना माहिती देणे व त्या त्यांचा लाभ मिळवून देण्याच्या कामांमध्ये खूप मोठे कार्य केलेले व विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी मिळणाऱ्या शिष्यवृत्ती व आजारी लोकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून भल्या मोठ्या प्रमाणात मदत मिळवून दिली आहे .

असा हा जनसामान्यातला जनतेच्या हृदयातला माणूस हमखास पंचायत समिती सदस्यपदी निवडून येणार म्हणजे येणार अशी चर्चा आता सुरू झाली आहे. काही मंडळींनी तरी आम्ही त्यांना भरघोस मताधिक्याने विजयी करणार म्हणजे करणार असा निश्चय बोलून दाखवला आहे.

अशाप्रकारे संजय पवार यांनीच लक्ष्मीदहिवडी पंचायत समितीची निवडणूक लढवावी अशी मागणी देगावचे उपसरपंच शरद डोईफोडे, घरनिकीचे सरपंच सौ. सुनीता प्रकाश रणदिवे, उपसरपंच बालाजी गरड, बापू दिलीप भुसे,शरदनगरचे सरपंच पांडुरंग रायबान, अकोल्याचे डेप्युटी माणिक इंगळे, महमदाबाद शेटफळचे श्रीकांत पाटील व इतर पदाधिकारी व ग्रामस्थातून  केली जात आहे.

संजय पवार हे सर्वसामान्य घरामधून पुढे आलेले नेतृत्व आहे. तसेच ते आवताडे घराण्याशी गेली 25 वर्ष एकनिष्ठ आहेत. आवताडे जे सांगतील तो शब्द प्रमाण मानून त्यांनी आतापर्यंत काम केले आहे.  त्यांच्या या निष्ठेची पक्षश्रेष्ठींनी त्यांची लक्ष्मी दहिवडी गटातून पंचायत समितीसाठी उमेदवारी जाहीर करावी, असा आम्हा सर्वांचा आग्रह आहे. तसेच त्यांना मानणारे समर्थक जिल्हा परिषद चार गटात असल्यामुळे त्याचा फायदा लक्ष्मीदहिवडी गटाबरोबर इतर तीन गटांना होणार आहे.

बापू दिलीप भुसे

उपसरपंच, घरनिकी

TAGGED:
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *