सोलापूर: संकल्प युथ फाऊंडेशन या संस्थेकडून दरवर्षीप्रमाणे या वर्षीही संसर्गित मुलामुलींच्या सोबत नवीन कपडे, मिठाई भरवून त्यांना घरी फराळ करण्याचे साहित्य प्रत्येकांना देण्यात आले.
गेल्या तेरा वर्षापासून सातत्यपूर्ण हा उपक्रम संस्थेच्या माध्यमातून राबवला जातो. संस्थेच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील 50 हून अधिक संसर्गित मुलांना एकत्रित करून या मुलांच्या सोबत दिवाळी मोठ्या उत्साहात समाजातील सामान्य लोकांसोबत साजरी केली जाते.या उपक्रमाचा उद्देश हा आहे की याही लोकांचे जीवन सामान्यच आहे याची जाणीव त्यांच्यामध्ये निर्माण व्हावी व त्यांना देखील जीवन जगण्याचा उत्साह निर्माण व्हावा व त्यांच्या मध्ये सकारात्मक विचार निर्माण व्हावे हा उद्देश या उपक्रमाचा आहे.
या दिवशी या मुलांना सकाळी बोलून या मुलांच्या नवीन कपडे घालून ओवाळणी करून त्यांना मिठाई भरून त्यांना घरी फराळ करण्याचा आनंद मिळावा म्हणून पंधरा किलोचा संपूर्ण कच्चा शिरा तसेच जेवणाची मेजवानी या मुलांना या दिवशी दिली जाते व त्यांचा दिवस खास बनवण्याचा प्रयत्न केला जातो.
या उपक्रमामध्ये सहभागी झालेल्या मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी व मुलांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष रामभाऊ दुधाळ, ज्येष्ठ विधीज्ञ बसवराज सलगर, सामाजिक कार्यकर्ते अतिश बनसोडे, ब्रह्मदेव श्रीमंगले, सचिन जगताप व संस्थेचे अध्यक्ष किरण लोंढे उपस्थित होते.
याप्रसंगी रामभाऊ दुधाळ यांनी आपले मनोगत व्यक्त करताना संकल्प युथ फाउंडेशन या मुलांसाठी संजीवनीप्रमाणे काम करून नवीन जन्मदिनाचे काम करत आहे. या मुलांना जगणं म्हणजे नेमकं काय याचा खरा अर्थ समजावून सांगते असे उपक्रम या मुलांसाठी झाले पाहिजेत आणि मुलांना जगण्याचा सकारात्मक ऊर्जा निर्माण केली पाहिजे असे विचार व्यक्त केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ओंकार साठे, रुद्र बेसरे, सोमनाथ लोखंडे, श्रवण घोडके ,बसवराज बेरे ,समृद्धी भोसले, मोहिते सिद्धार्थ भंडारे ,सागर देवकुळे, नितेश फुलारी, साईराज राऊळ, धनराज मडगोड, यांनी परिश्रम घेतले.
