सोलापूर : जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात शनिवारी जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटनेची सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या सभेत लेखाधिकारी हरिष मेहेत्रस, सहाय्यक लेखा अधिकारी अनंता माने, संजय पाटील व रफिक मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन कार्यकारणीची निवड करण्यात अली.
संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून पंचायत समिती सांगोला येथील सहाय्यक लेखा अधिकारी आनंद जाधव,
कार्याध्यक्ष म्हणून डी.आर.डी.ए. येथील सहाय्यक लेखाधिकारी सूर्यकांत तोडकरी आणि
सचिव म्हणून ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे सहाय्यक लेखा अधिकारी प्रकाश शेंडगे, तसेच खजिनदार म्हणून बांधकाम विभाग क्र. २ चे वरिष्ठ सहाय्यक लेखा श्री. मंगेश शिंदे यांची निवड करण्यात आली. या सभेचे सूत्रसंचलन अमित सरगर यांनी केले. प्रस्तावना उमाकांत राजगुरू यांनी मांडली. मावळते अध्यक्ष अनिल बिराजदार यांनी नवीन कार्यकरणींस पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व मनोगत व्यक्त केले. तसेच सभेसाठी जि.प. विभागाचे सहाय्यक लेखाधिकारी दत्तात्रय घोडके, योगेश काटकधोंड, नागय्या मठपती, अंकुश खेलबुडे, गोपीचंद नारायणकर, भूषण काळे, सावळा काळे,रेखा राजगुरू तसेच पंचायत समितीचे सहाय्यक लेखाधिकारी गुरुनाथ जाधव, योगेश अवघडे,कनाके, संतोष शेळके, दिपक शेडे, कनिष्ठ लेखाधिकारीमधील अमित सलगर, मनोज साठे, महेश भोसले, लक्ष्मण झिपरे, जमीर शेख,गुजर, शामल काळे, वैजिनाथ गायकवाड,कारंडे, बोरकर, वरिष्ठ सहाय्यक (लेखा) मधील विलास मसलकर, खंडागळे, रोहित घुले,योगेश हब्बू,रवी लिगाडे, घोडके सौ.महामूरे, पांचाळ,विजय लिंगराज, श्रेयश, विजय आदलिंगे कनिष्ठ सहाय्यक (लेखा ) मधील सौ.कुंभार, बिचल,मुलाणी, देसाई उपस्थित होते.

More Stories
झेडपीच्या अर्थ विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करा
गॅस टंचाईचे सोडा महागाई पुन्हा भडकली
‘स्टॉप कॅन्सर’ कार्यशाळेत महिलांना मिळाले कॅन्सर प्रतिबंधासाठी ज्ञान