सोलापूर : जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना नवीन गाड्या देण्यात येणार आहेत. तसा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांकडे पाठविला असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी दीपक वैद्य तर उपाध्यक्षपदी इंद्रजीत पवार यांची निवड झाली आहे. अध्यक्षांसाठी यापूर्वीच्या अध्यक्षाची सफारी गाडी आहे. पण ही गाडी आता खूपच जुनी झाली आहे. उपाध्यक्ष व इतर विषय समितीच्या सभापतींनाही गाड्या नाहीत. यापूर्वीच्या गाड्या जीर्ण झाल्यामुळे आरटीओच्या परवानगीने भंगारत काढण्यात आले आहेत. त्यामुळे सर्व पदाधिकाऱ्यांना नवीन गाड्या घेण्याचा प्रस्ताव प्रशासनाने अध्यक्ष दीपक वैद्य यांच्याकडे पाठवला आहे. त्यांच्या अधिकारात कोणत्या गाड्या घ्यायच्या हे ठरणार आहे. उपाध्यक्ष इंद्रजीत पवार हे सध्या स्वतःचीच गाडी वापरत आहेत. त्यामुळे लवकरच आता जिल्हा परिषदेच्या ताब्यात नव्या गाड्या दाखल होणार आहेत. 27 मार्च रोजी विषय समितीचे सभापती निवडण्यात येणार आहेत. त्यानंतर विषय समितीचे सदस्य निवडण्यासाठी एप्रिलमध्ये सभा होणार आहे. विषय समितीचे सभापती निवडल्यानंतर अध्यक्षाच्या परवानगीने पहिले सर्वसाधारण सभा होईल वाहन खरेदीसह इतर महत्त्वाच्या विषयावर निर्णय घेतला जाणार आहे.
दररोज सगळ्यांना भेटणार…
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य म्हणाले क मी सुट्टी वगळता दररोज सर्व लोकांना भेटणार आहे. जिल्हा परिषदेच्या लोगोवर शेतकरी व बैल जोडी आहे. शेतकऱ्यांसाठीच मी काम करणार आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या शाळा व आरोग्य केंद्र सुधारले पाहिजेत. यांची सेवा दर्जेदार होण्यासाठी काय काय करता येईल ते मी करणार आहे. आरोग्य केंद्रात श्वान व सर्पदंश लशी मुबलक राहतील याकडे लक्ष देणार आहे. अंगणवाडी व जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा सुधारून पटसंख्या वाढेल याकडे लक्ष देणार आहे. शाळांची परिस्थिती पाहण्यासाठी मी माझ्या गावातीलच शाळेला भेट दिली. शिक्षकानी जास्तीत जास्त वेळ शाळेवर राहून विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देण्यावर भर द्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

More Stories
बापरे… मुलांची विमानाने सहल घडविणाऱ्या गुरुजीवर ही काय वेळ आली
कृषी धान्य महोत्सवात मंद्रूपच्या हुरड्याने खाल्ला “भाव’
सोलापूर झेडपीचे उपाध्यक्ष इंद्रजीत पवार म्हणाले झेडपी सभागृहात का नाहीत थोर महापुरुषांची तैलचित्रे