March 30, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

पॉसिबल एज्युकेशन सेंटरतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

सोलापूर: माढा तालुक्यातील उपळाई बुद्रुक येथील आनंदी बहुउद्देशीय सामाजिक संस्था संचलित पॉसिबल एज्यूकेशन अँड ट्रेनिंग सेंटर तर्फे NMMS मध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष वैभव गोरे  (माढा तालुका उपाध्यक्ष, राष्ट्रवादी (शरद पवार गट) तर प्रमुख पाहुणे प्रा. नितीन झाडबुके नूतन माढा तालुका पंचायत समिती सदस्य (प्रवक्ता भाजप) उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. संस्थेचे सचिव. डॉ. अतुल ज्ञानेश्वर क्षीरसागर व सदस्य  सागर गाडेकर यांनी प्रमुख पाहुणे व अध्यक्षांचा यांचा सत्कार केला. प्रास्ताविकमध्ये डॉ. अतुल क्षीरसागर यांनी 100% विद्यार्थी पास झाल्याचे सांगितले. अशा कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना कायम प्रेरणा देत राहू व नवनवीन उपक्रम राबवू असे सांगितले. NMMS Dec 2025 मध्ये उत्तीर्ण अनुष्का उडगे, समर्थ माळी, समर्थ शिंदे,  प्रतीक्षा भांगे, पार्थ काटे, सर्वार्थ फुगे, अभिषेक गोरे,  श्रावणी दसंगे, शिवम बेडगे, आर्यन शिंदे, तनिष्का कोरके या सर्व विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर सदस्य सागर गाडेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात वैभव गोरे यांनी यावर्षी क्षीरसागर यांनी अतिशय परिश्रम घेऊन विद्यार्थी घडविले असे सांगितले.  प्रा. नितीन झाडबुके यांनी यश आले म्हणून हुरळून जाऊ नका असा सल्ला दिला. यावेळी त्यांनी शिक्षणाचे मोल, अभ्यास पद्धती सांगितली. यावेळी अनुष्का उडगे हिने आपले मनोगत व्यक्त केले. तनिष नागटिळक, श्रेयस गोरे यांनी कार्यक्रम यशस्वीते साठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वराली शिंदे व शिवमुद्रा नागटिळक यांनी केले.