सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागात कार्यरत असलेले कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी यांना सेवानिवृत्तीनिमित्त त्यांचा सन्मान जिल्हा परिषदचे अध्यक्ष दीपक वैद्य यांचेहस्ते करण्यात आला.
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करणेत आले होते. याप्रसंगी उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, महिला व बालकल्याण सभापती अमृता वाघे, कृषी व पशुसंवर्धन विभागाचे सभापती रामप्पा चिवडशेट्टी, जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार, जिल्हा परिषद सदस्य अजिनाथ देशमुख, नेताजी खंडागळे यांचेसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जलजीवनला गती : कुलदीप जंगम
संजय धनशेट्टी यांनी निधीची अडचण असतानाही जलजीवन मिशनची कामे वेगाने पुर्ण केली. २४० कामे पुर्ण करत असताना टॅंकरची २१४ वरून ६९ टॅंकरवर आली आहे, हे या अभियानाचे यश आहे. धाडसाने कामे केलेमुळे त्यांनी गावपातळीवर कामे, ठेकेदार, पदाधिकारी यांचेशी समन्वय साधून काम केल्याबद्दल सीईओ जंगम यांनी त्यांचे कौतुक केले.
उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी धनशेट्टी यांचे कार्याचा गौरव करून त्यांनी उत्तर सोलापूर तालुक्यात केलेले कामाचा गौरव केला. हातात घेतलेले काम तडीस नेणारा अधिकारी म्हणून संजय धनशेट्टी यांचे कार्याचा गौरव केला. या प्रसंगी महिला व बाल कल्याण समितीचे सभापती अमृता वाघे यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दिपक वैद्य यांनी जलजीवन मिशन योजना दिशादर्शक असून या कामात धनशेट्टी यांचे योगदान महत्वपुर्ण असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक व्यवस्थापक सचिन जाधव यांनी केले. जिल्हा परिषद सदस्य नेताजी खंडागळे व जिल्हा परिषद सदस्य अजिनाथ देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत वरिष्ठ सहाय्यक रणजित घोडके यांनी केले. अक्कलकोट – विद्याधर राठोड, बार्शी व माढा – अजित वाघमारे, करमाळा – वाहेकर साहेब, पंढरपूर – नितीन करवते साहेब, मोहोळ – वसीम शेख, उत्तर सोलापूर -बेंबळगी साहेब , मंगळवेढा – प्रसाद काटकर, दक्षिण सोलापूर – दत्तात्रय सोनवणे, सहाय्यक लेखाधिकारी – प्रकाश शेंडगे, वरिष्ठ सहाय्यक – अमित सलगर, सांगोला – सदाशिव पुजारी आदी उपस्थित होते.
सिईओ कुलदीप जंगम यांचा गौरव
सोलापूर जिल्हा परिषदेत उत्कृष्ठ काम केले बद्दल राज्यात प्रथम क्रमांक पटाकविले बद्दल जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दिपक वैद्य व उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांचे हस्ते करणेत आला. १०० पैकी ८० गुण मिळवून जिल्हा परिषदेची मान राज्यात उंचावण्याचे काम सिईओ कुलदीप जंगम यांनी केले आहे. शाल, पुष्पगुच्छ देऊन सिईओ कुलदीप जंगम यांचा सन्मान या प्रसंगी करणेत आला. या कार्यक्रमासाठी वरिष्ठ सहाय्यक रणजित घोडके, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, योगेश कुंभार, अमित , बापु शेंडगे, ओम बुरसे यांनी प्रयत्न केले.

More Stories
अभिनंदन: वारी विनावाद टेंडर, स्वच्छतागृह, जर्मन हँगरची सुविधा; क्रेडिट गोज टू कोहीणकर
सोलापूर झेडपी पदाधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वागत
पंढरपूर कॉरिडॉरचे काम कोणावरही अन्याय न करता योग्य पुनर्वसन करून पूर्ण करणार