सोलापूर: प्रशासनाच्या आपत्कालीन हेल्पलाईनवर चार दिवसात गॅस एजन्सी बाबतीत ४० तक्रारी प्राप्त तर दुसरीकडे अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पाडोळे ह्यांनी घरगुती गॅसचा अवैधरित्या व्यावसायिक वापर करणाऱ्यावर धडक मोहिम हाती घेतली आहे.
सोलापूर जिल्ह्याचे नवनिर्वाचित जिल्हाधिकारी एस कार्तिकेयेन रुजू होताच नागरिकांनी सध्या सोलापूर शहरातील गॅस एजन्सीबाबतीत तक्रारीचा पाढा वाचला आहे. त्या धर्तीवर जिल्हाधिकारी कार्तिकेयेन यांनी नागरिकांच्या इतर तक्रारी सोबतच ई केवायसी बाबतीत मार्गदर्शन केले आहे.
आखाती युद्धच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी सायंकाळी अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पाडोळे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या नेतृत्वासह आसार मैदान (सावरकर मैदान) येथील चौपाटी, किल्ला बागेच्या बाजूस चायनीज गाड्या व पावभाजी सेंटरवर धाडी टाकण्यात आल्या. यावेळी नऊ घरगुती वापराचे सिलेंडर व्यावसायिक ठिकाणी अवैधरित्या वापरत असल्याचे दिसून आल्यावर पथकासमक्ष जप्त करण्यात आले.रात्री उशिरापर्यंत फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे कामकाज चालू होते.
या पथकात परिमंडळ अधिकारी ब विभाग राजेश यमपुरे, परिमंडळ अधिकारी अ विभाग नंदकिशोर डोके परिमंडळ अधिकारी ड विभाग प्रफुल नाईक पुरवठा निरीक्षक ज्ञानेश्वर काशीद, सज्जन भोसले, गीता डंके लिपिक वैभव मोरे, सचिन लांडे,आनंद मधणे तसेच पोलीस प्रशासनातून पोलीस अंमलदार जावेद जमादार,आबाजी सावळे, धीरज सातपुते, विठ्ठल यलमार आदी उपस्थित होते.

More Stories
बापरे… धो धो बरसणार परतीचा पाऊस
सोलापूर झेडपी स्थायी समितीचा दणका; आरोग्यातील 35 परिचराना मिळाली पदोन्नती
प्रत्येक पात्र मतदाराचे नाव अंतिम यादीत आलेच पाहिजे ; ४ नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी होणार प्रसिद्ध