सोलापूर : जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष व सभापतींची निवड बिनविरोध झालेले असतानाच आता विषय समिती सदस्यपदी शिंदे शिवसेना गटाने विषय समिती सदस्य पदासाठी भाजप विरोधात फार्म भरल्यामुळे चर्चेचा विषय झाला आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेच्या विषय समितीच्या 83 सदस्य निवडीसाठी बुधवारी दुपारी दोन वाजता विशेष सभा बोलवण्यात आले आहे. तत्पूर्वी विषय समिती सदस्य निवडीसाठी सकाळी फॉर्म भरण्याची मुदत होती. या काळात शिंदे शिवसेनेचे अक्कलकोट तालुक्यातील सदस्य शिवराज मेत्रे व तानवडे यांनी बांधकाम, समाजकल्याण व स्थायी समिती सदस्य पदासाठी फॉर्म भरले आहेत. त्यामुळे या तीनच विषय समिती सदस्य निवडीसाठी निवडणूक लागण्याचे चिन्हे आहेत. विषय समितीचे सदस्य बिनविरोध होण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सर्वच पक्षांना न्याय देण्याची भूमिका घेतली होती. त्यानुसार जिल्हा परिषदेचे पदाधिकारी शिंदे शिवसेना व राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या संपर्कात होते. पण सर्वच सदस्यांचा स्थायी व समाज कल्याण समितीसाठी मोठा आग्रह होता. यात न्याय मिळत नसल्याने शिंदे गटाच्या दोन सदस्यांनी बंडखोरीकरण फॉर्म भरले आहेत. त्यामुळे सोलापूर जिल्हा परिषदेत पदाधिकारी निवड बिनविरोध झालेली असताना आता विषय समितीच्या सदस्यासाठी निवडणूक लागण्याचे चिन्ह दिसत आहेत. बुधवारी दुपारी दोन वाजता खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

More Stories
झेडपीच्या गुरुजीचा आत्मदहनाचा इशारा; कारण ऐकून तुम्ही व्हाल चकित
हातात कात्री, मनात जिद्द अन् डोळ्यांत स्वप्न; अभिमन्यूंच्या सलूनने बदलली जगण्याची दिशा
बापरे… धो धो बरसणार परतीचा पाऊस