सोलापूर : अक्कलकोट तालुक्यातील झेडपीच्या दोन सदस्यांच्या नाट्यमय निर्णयानंतर अखेर सोलापूर जिल्हा परिषदेच्या विषय समितीचे 83 सदस्य बिनविरोध झाले आहेत. यामध्ये शिवराज म्हेत्रे यांची शिक्षण व प्रवीण तानवडे यांची अर्थ समितीच्या सदस्यपदी वर्णी लागली आहे.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य व उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषदेची विशेष सभा झाली. सभेत विशेष समितीच्या सदस्य पदासाठी अर्ज घेण्यात आले. ठरल्याप्रमाणे भाजप व मित्र पक्षांच्या सदस्यांनी अर्ज भरले. पण यात अक्कलकोटमधील शिंदे सेनेचे सदस्य शिवराज मेहत्रे व तानवडे यांचे नाव नव्हते. त्यामुळे त्यांनी बंडखोरी करीत समाजकल्याण, शिक्षण, अर्थ व बांधकाम समितीसाठी अर्ज भरला. त्यामुळे झेडपी अध्यक्ष उपाध्यक्ष व विषय समितीची निवडणूक बिनविरोध झाली असताना विषय समितीच्या सदस्यासाठी निवडणूक लढण्याची शक्यता निर्माण झाली. यामुळे ठरल्यावेळेत सभा तहकूब करण्याची नामुष्की भाजपवर आली. त्यामुळे भाजपच्या नेत्याची बालाजी सरोवर येथे बैठक झाली. या बैठकीत दोन्ही नाराज सदस्यांची समजूत काढण्यात आली व त्यांना समिती देण्याचे ठरले. त्यामुळे या दोघांनी माघार घेतल्यामुळे अखेर निवडणूक टळली. दुपारी साडेतीन वाजता विशेष सभा होऊन निवडणूक निर्णय अधिकारी तथा सभेच्या सचिव स्मिता पाटील यांनी सर्व विषय समितीचे सदस्य बिनविरोध झाल्याचे घोषित केले.
पडद्यामागे घडल्या घडामोडी
विषय समिती सदस्य पदासाठी भाजपने शिंदे शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार गटाबरोबरच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अर्जुनसिंह मोहिते- पाटील यांनाही संधी दिली. पण या सदस्य गटाच्या यादीत आपले नाव नसल्याचे कळताच अक्कलकोटच्या शिंदे शिवसेना गटाचे शिवराज मेत्रे व प्रवीण तानवडे यांनी उमेदवारी दाखल केली. त्यामुळे निवडणूक लागण्याची शक्यता निर्माण झाली. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजीत पवार व पक्षनेत्या रश्मी बागल यांनी ही बाब गभीर्याने घेत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली. त्यानंतर भाजपचे आमदार सरोवर येथे जमले. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याशी संपर्क करून यातून मार्ग काढला असल्याचे सांगण्यात आले. पालकमंत्री गोरे यांनी तात्काळ तानवडे व मेत्रे यांना न्याय दिला. त्यामुळे निवडणूक टळली. यामुळे प्रशासनावरील ताण कमी झाला.
काय झाले असते…
तानवडे व मेत्रे यांच्या अर्जामुळे निवडणूक लागली असती तर काय झाले असते, अशी चर्चा सुरू झाली. भाजपने जिल्हा परिषदेत एक हाती सत्ता घेतली असली तरी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मित्र पक्षांना न्याय दिला आहे. त्यामुळे अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती यांची निवडणूक बिनविरोध झाली. विषय समितीच्या सदस्यासाठी निवडणूक लागली असती तरी मेहत्रे व तानवडे हे निवडून आले नसते. शिंदे शिवसेनेचे इतर सर्व सदस्य भाजपबरोबर होते. पण ही निवडणूक प्रक्रिया राबविणे अवघड होते. शिवाय यात विनाकारण भाजपची बदनामी झाली असती. त्यामुळे कोणाच्या हट्टाकडे लक्ष न देता ही निवडणूक बिनविरोध कशी होईल? याकडे भाजपच्या वरिष्ठांनी लक्ष दिल्याने चांगला पायंडा पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
विषय समितीच्या सदस्यपदी पुढीलप्रमाणे निवड झाली आहे.
स्थायी समिती
पृथ्वीराज माने, शांभवी
कल्याणशेट्टी, आदिनाथ
देशमुख, रश्मी बागल, बालाजी नरुटे, दादासाहेब
लवटे, सविता उंबरजे, रमेश भांजे,
जलव्यस्थापन व स्वच्छता समिती सदस्य:
सिद्धाराम शिवमुती, गीतांजली साळुंखे, नंदकुमार काळे, रश्मी हिप्परगी, षण्मुखी कोरके, वंदना कांबळे.
शिक्षण समिती सदस्य:
चंद्रकांत जाधव, सोनाली बोधले, वंदना कांबळे, सुषमा नारनवर, दिपाली ताड, श्रुती भोरगुंडे, विजयराज डोंगरे, शिवराज म्हेत्रे.
आरोग्य समिती सदस्य:
सोनाली कडते, संगीता दुधाळ, संदीप टेळे, मीनाक्षी रोंगे, शोभा खटकाळे, नागनाथ भोसले, सविता कोकाटे, व्यंकटराव भालके.
अर्थ समिती सदस्य:
प्रवीण तानवडे, पुनम इंगवले, रेश्मा डोके,
अर्जुनसिंह मोहिते-पाटील, पृथ्वीराज
सावंत, लखन शिंदे, चरण
चवरे, केरबा पांढरे.
बांधकाम समिती सदस्य:
विकास बुळ्ळा, नेताजी खंडागळे, प्रदीप खांडेकर, सचिन जाधव, अश्विनी चिवटे, पूजा ढेरे, अतुल पवार, लक्ष्मी पाटील.
पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती:
नंदकुमार वाघमारे, असलम चौधरी, गौतम माने, रूपाली गोडसे, पृथ्वीराज सावंत, विकास बुळ्ळा, नीलावती ठवरे, वनिता गुळवे.
महिला व बालकल्याण समिती:
सुजाता डोईफोडे, करुणा शिवशरण, चैताली मुळे, दुर्गा अंकुशराव, मीनाक्षी सरतापे, कल्याणी तळेकर, मयुरी बागल, भारती दराडे.
समाजकल्याण समिती:
सविता उंबरजे,शिवाणी स्वामी, नंदकुमार वाघमारे,तेजस्विनी बोराडे, सुप्रिया गायकवाड,संगीता मोटे,विमल खताळ,श्रुती भोरगुंडे,प्रशांत पाटील,करुणा शिवशरण, सिधु आलदर.

More Stories
पहाटे तीन पर्यंत चालली बैठक तरी सकाळी झेडपीत राडाच रे बाबा
सोलापूर झेडपी सीईओवर पुन्हा अन्याय… तुम्हाला काय वाटते?
कुशल जैन सोलापूर झेडपीचे नवीन सीईओ