सोलापूर : जिल्हा परिषदेचे नुतन मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे स्वागत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दिपक वैद्य व उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी पुष्पगुच्छ देऊन केले.
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात गुरुवारी नुतन जिल्हा परिषद सदस्य व सभापती यांचेसाठी प्रशिक्षणाचे आयोजन यशदा, पुणे व जिल्हा परिषदेच्यावतीने करणेत आले होते. याप्रसंगी सिईओ कुशल जैन यांनी भेट दिलेनंतर जिल्हा परिषदेच्यावतीने सिईओ कुशल जैन यांचे पदाधिकारी यांनी स्वागत केले. यशदाचे उप महासंचालक डाॅ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी मी विकास यात्री पुस्तक देऊन सिईओ जैन यांचे स्वागत केले. याप्रसंगी शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंह केदार, समाजकल्याण विभागाच्या सभापती संस्कृती सातपुते, कृषि व पशुसंवर्धन समितीचे सभापती रामप्पा चिवडशेट्टी, महिला व बालकल्याण समितीचे सभापती अॅड. अमृता वाघे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी संदीप कोहिणकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, सुर्यकांत भुजबळ उपस्थित होते.
जिल्हा परिषदेचे सदस्य यांनी नुतन सिईओ कुशल जैन यांना भेटून संवाद साधून स्वागत केले.

More Stories
झेडपीच्या गुरुजीचा आत्मदहनाचा इशारा; कारण ऐकून तुम्ही व्हाल चकित
हातात कात्री, मनात जिद्द अन् डोळ्यांत स्वप्न; अभिमन्यूंच्या सलूनने बदलली जगण्याची दिशा
बापरे… धो धो बरसणार परतीचा पाऊस