सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून नांदेडचे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड यांची नियुक्ती झाली आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांची नांदेडचे जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी म्हणून बदली झाली आहे. त्यांच्या जागी नांदेडचे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड यांची नियुक्ती झाली आहे. डॉक्टर नवले यांच्या बदलीला काही काळ उरला होता. बदलून जाताना त्यांची नियुक्ती समक्ष पदावर किंवा पदोन्नतीने उपसंचालक म्हणून होणे अपेक्षित होते. पण माता बाल संगोपनच्या छोट्या जबाबदारीवर त्यांची बोळवण करण्यात आल्याबद्दल चर्चा सुरू झाली आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील इतिहासातील सर्वात तरुण डॉक्टर जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून कोपुरवाड लाभले आहेत. आषाढी यात्रेच्या तोंडावर त्यांची नियुक्ती झाल्यामुळे जिल्हा आरोग्य विभागाचा मोठा डोलारा सांभाळण्याची त्यांच्यावर जबाबदारी आली आहे. जिल्हा परिषदेचे सीईओ म्हणून कुशल जैन यांनी पदभार स्वीकारल्यानंतर दुसऱ्याच दिवशी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची बदली झाली आहे. नवीन सीईओंसोबत काम करण्याची डॉ. कोपरवाड यांना संधी मिळाली आहे. आरोग्य विभागाचे मोठे नेटवर्क कुशलतेने हाताळण्याचे आव्हान त्यांच्यासमोर राहणार आहे.

More Stories
झेडपीच्या गुरुजीचा आत्मदहनाचा इशारा; कारण ऐकून तुम्ही व्हाल चकित
हातात कात्री, मनात जिद्द अन् डोळ्यांत स्वप्न; अभिमन्यूंच्या सलूनने बदलली जगण्याची दिशा
बापरे… धो धो बरसणार परतीचा पाऊस