सोलापूर : सोलापुरात आयटी पार्क होणार अशी चर्चा सुरू असतानाच आयटी कंपन्यांना चुना लावणारे रॅकेट उघड झाले आहे. सोलापूर पोलीस आयुक्तालयातील सायबर शाखेने राजस्वनगर येथे छापा मारून आयटी कंपन्यांना फसविणारे एक मोठे रॅकेट उघड केले असून याप्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सूत्रधाराला अटक करून न्यायालयासमोर हजर केल्यावर न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
सायबर शाखेतील फौजदार नागेश इंगळे यांनी फिर्याद दिली आहे. सायबर सेलचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्रीशैल गजा यांनी फौजदार इंगळे व प्रविण भोपळे यांना विजापुर नाका पोलीस ठाणे हदितील राजस्वनगर येथील एका घरात एक इसम त्याचे साथीदारासोबत ONLINE SHARE MARKET संदर्भात तसेच भारतातील विविध राज्यातील नोकरिच्या शोधात असलेल्या मुलांना त्याचे संपर्कात असलेल्या वेगवेगळ्या VENDOR च्या माध्यमातुन खाजगी कंपनीमध्ये नोकरीसाठी आवश्यक असलेले सर्टीफिकेट बेकायदेशीर मार्गाने मिळवुन देवुन मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर आर्थिक उलाढाल करत असलेबाबत चौकशी करणेकामी राजस्वनगर परिसरात पाळत ठेवण्याबाबत सूचित केले. यानुसार 16 एप्रिल रोजी वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्रीशैल गजा, पोलीस उप निरीक्षक प्रविण भोपळे व सोबत पोलीस पथक घेवुन राजस्वनगर या ठिकाणी गोपनिय बातमीदाराने सांगीतलेल्या पत्त्यावर जावुन पाहणी केली. संबंधित ठिकाणी एक राहते घर दिसले सदरचे घर आतून बंद असल्याचे व घराचे दारे-खिडक्या बंद असल्याचे दिसुन आले. तसेच घरासमोर 5 ते 6 मोटार सायकली उभ्या असल्याचे दिसुन आले . थोडा वेळ सदर ठिकाणी आडोशाला उभे राहून पाहणी केली असता सदर घरामधुन प्रथम एक मुलगा बाहेर आला व तो मोटार सायकल घेवुन निघुन गेला. त्यानंतर थोड्या-थोड्या अंतराचे वेळेने सदर घरातुन 5 महीला बाहेर पडल्या व सदर महीला त्यांच्या मोटार सायकली घेवुन तेथून निघुन गेल्या. सदर महीलांचे त्या ठिकाणी वावरने संशयास्पद असल्याचे दिसुन आले. त्यानंतर पोलीस पथकासह पोलीस ठाणेस परत गेले. वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्रीशैल गजा यांनी या रिपोर्टबाबत वरिष्ठासमक्ष चर्चा करुन वरिष्टाकडुन सदर कार्यालय येथे छापा कारवाई करणेबाबत परवागी घेतली. त्या अनुशंगाने दि. 17 एप्रिल रोजी सकाळी 9:30 वाजता फौजदार इंगळे, भोपळे, हवालदार निलेश गंगावणे, पोलीस शिपाई आशिष राठोड, नाना काळे, सचिन अंबलगी, महिला पोलीस भाग्यश्री वाळे, दहिंहडे यांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीशैल गजा यांनी मार्गदर्शन करून ” राजस्व नगर येथील वर नमूद कार्यालयावर छापा कारवाई करण्याबाबत आदेश दिले. याबाबत सोलापूर शहर सायबर पोलीस ठाणे स्टेशन डायरीत नोंद घेतली. त्यानंतर सदर ठिकाणी पोहचल्यानंतर सदरचे कार्यालय चालू होते. पथकाने छापा मारल्यावर त्या कार्यालयात तीन रूम असून एका रूममध्ये मध्यभागी टेबलावर सात संगणक दिसले. तेथे काही कर्मचारी कामकाज करीत असल्याचे दिसले. त्यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी त्यांची नावे सानिया शेख ( रा. रामवाडी), सदफ अल्लाऊद्दीन शेख (वय-26 वर्षे राह एम-1 सुदरमनगर, आरटीओ आफिस जवळ, विजापूर रोड सोलापूर), सोनाली साळुंखे ( रा. प्लॉट नं. 8 स्वराजनगर, वसंत विहार), भाग्यश्री लकडे ( रा. 245 सुशिल नगर),योगेश ज्ञानेश्वर शिंदे (वय 30 वर्षे रा.प्रसादनगर, जुळे सोलापूर) हे कार्यालयामध्ये हजर होते. त्यावेळी त्यांचेकडे चौकशी केली असता त्यांचे कार्यालयाचे नाव Hest Solutation असे असून सदरचे कर्यालय हे अशपाक अत्तार यांचे मालकीचे असल्याचे सांगितले त्यावेळी योगेश शिंदे याच्या मार्फतीने सदर परिसरामध्ये राहणारे Hest Solutation मालक अशपाक अत्तार यांना कार्यालयात बोलावून घेण्यात आले. त्यांचेकडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीशैल गजा यांनी कार्यालयामध्ये कोणत्या प्रकारचे काम चालते, कामाचे स्वरूप काय याबाबत चौकशी केली. त्यावर संशयिताने अश्पाक हेब्जुरहिमान अत्तार ( वय 46 वर्षे, रा. सी 195 राजस्व नगर, विजापूर रोड सोलापूर) अशी आपली ओळख दिली. पण पोलिसांनी विचारलेल्या एकाही प्रश्नाचे त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही. सदरचा प्रकार फसवणुकीचा असल्याचे प्रथमदर्शी र्निदशनास आले. त्यामुळे पोलिसांनी कार्यालय सील करून पुढील कारवाई करण्यासाठी सर्वांना सायबर सेलमध्ये नेण्यात आले. तेथे सानिया शेख तिच्याकडे चौकशी केल्यावर ती एक्झाम रायटर असून “सदरचे कार्यालय ULTRA INFOTECH IT कंपनी असे असल्याचे सांगितले. या कार्यालयाचे चालक-मालक अशपाक अत्तार हेच असून ऑक्टोबर 2024 पासून या कंपनीमध्ये नौकरी करत असलेबाबत सांगितले. तिने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी CYBER EXPERT अविनाश पाटील यांची मदत घेऊन ऑनलाईन माहिती काढली. त्यात ULTRA INFOTECH IT कंपनी यामध्ये VENDOR कंपनी यांचे RECRUITMENT असे HIGHER करतो. त्याद्वारे त्यांचे OLNILE मुलाखती होतात. उमेदवार हा ज्या संगणकावर उपलब्ध असतो. त्या उमेदवारास आम्ही आमचे अधिकृत REMOTE ACCESS (SCREEN SHARE) असलेले SOFTWARE ‘REMOTE SHARE’ हे वापरण्यास देतो. उमेदवार आम्ही पाठविलेले लिंकद्वारे आमच्या ULTRA INFOTECH IT कंपनी यास REMOTE ACCESS देतो. ज्याद्वारे आम्ही सदर उमेदवाराचा ACCESS घेतो. त्याद्वारे उमेदवार कंपनी समोर WEB SITE THROUGH अधिकृत ONLINE VIRTULLY हजर असतो. मात्र सदर उमेदवाराची सर्व EXAM ही आमची कंपनी ULTRA INFOTECH IT कंपनी CONDUCT करते. सदर EXAM देत असताना माझे कार्यालयातील सहकारी हे CHAT-GPT, GOOLGLE GEMINI तसेच इतर AI यांचा वापर करतात. अशा प्रकारे EXAM CODUCT होताना, PHYSICAL IP हा कंपन्यांना सदर उमेदवाराचा होतो. मात्र सर्व EXAM ही ULTRA INFOTECH IT कंपनी द्वारे केली जाते. हैदराबादची ती कंपनी असून या कंपनीचे ॲक्सेस घेण्यासाठी महिना सात हजार रुपये भाडे भरले जाते. अशाप्रकारे आत्तापर्यंत दीड ते दोन हजार परीक्षा कंडक्ट केल्याचे दिसून आले आहे.
ऑनलाईन परीक्षेदरम्यान उमेदवाराने संगणक / लॅपटॉपचा अनधिकृत रिमोट अॅक्सेस स्वतः घेऊन, त्या व्यक्तीद्वारे परीक्षा प्रक्रियेत हस्तक्षेप करून संबंधित कंपनी/संस्थेची फसवणूक करतात. सदर प्रकरणात ऑनलाईन परीक्षेच्या वेळी परीक्षार्थीने जाणूनबुजून बाहेरील व्यक्तीस लॅपटॉपचा अॅक्सेस उपलब्ध करून दिला, ज्यामुळे परीक्षा प्रक्रियेत गैरप्रकार होऊन संस्थेची आर्थिक / प्रतिष्ठात्मक फसवणूक केली जाते. तसेच परीक्षेदरम्यान तांत्रिक साधनांचा गैरवापर करून आरोर्पिता कडून उत्तरपत्रिका सोडवून घेणे/सहाय्य घेणे हा सायबर फसवणुकीचा गंभीर प्रकार केला जातो. यामध्ये कंपनीची दिशाभूल करण्यात येते. नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारकिडून पैसे घेतात. ऑनलाइन मुलाखती व परीक्षांमध्ये दुसऱ्या व्यक्तीकडून परीक्षा देणे द्वारे सिस्टीममध्ये छेडछाड करतात. तसेच विविध कंपन्यांची फसवणूक करून उमेदवारांना चुकीच्या पद्धतीने नोकरी मिळवून देणे असे प्रक्रार संगनमताने या प्रकारे आरोपींनी स्वतःचा आर्थिक फायदा करून घेतला असून फियादी व इतर नागरिकाची फसवणूक केली आहे. अशी खात्री झाल्याने मी शासनातर्फे फिंयाद देत आहे. तरी साधारण ऑक्टोबर 2024 पासुनते दि. 17 एप्रिल2026 पर्यंत ULTRA INFOTECH IT कंपनी बी-83 राजस्व नगर, विजापूर रोड सोलापूर शहर या ठिकाणी आरोपी अश्पाक हेब्जुरहिमान अत्तार व त्यांना मदत करणारे इतर इसम व त्यांच्याशी संपर्क साधणारे व्हेंडर यांनी आपसात संगनमत करून कॉम्प्युटर व इंटरनेटचा वापर करून, नोकरी साठी किंवा नोकरीत असणारे पदोन्नतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून पैसे घेवुन त्यांच्या ऑनलाइन मुलाखती व परीक्षांमध्ये दुसऱ्या व्यक्तीकडून परीक्षा देणे साठी सिस्टीममध्ये छेडछाड केली. तसेच विविध कंपन्यांची फसवणूक करून उमेदवारांना चुकीच्या पद्धतीने नोकरी मिळवून देणे व पपदोन्नतीसाठी विविध कोर्सेचे कोर्सेचे प्रमाणपत्र मिळवून देण्याचे काम करून या प्रकारे आरोपींनी स्वतःचा आर्थिक फायदा करून घेतला असून संबंधीत IT कंपनी यांची फसवणूक केली आहे. या मध्ये ONLINE INTERNET तसेच संगणक यांचा वापर केला आहे. त्यामुळे सदर आरोर्पिता विरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 (BNS) कलम 318 (4), 319 (2), 3(5), 61(2) Information Technology Act 2000, Section 66, 66C, 66D प्रमाणे शासनातर्फे कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील सूत्रधाराला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता पोलीस तपासासाठी न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

More Stories
विमानसेवा व आयटी पार्कमुळे सोलापूर विकासाच्या नव्या उंबरठ्यावर
डॉ. सतीश कोपूरवाड यांच्याकडे सोलापूर जिल्ह्याच्या आरोग्याची धुरा
सिईओ कुशल जैन यांचे झेडपीच्या पदाधिकाऱ्यांकडून स्वागत