सोलापूर: आषाढी यात्रा काळातील महत्त्वाचे स्थान असलेला श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व श्री संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळा. हा सोहळा कोणत्या मार्गावरून येतो व त्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांना कोणत्या सुविधा द्याव्य लागतात याची माहिती घेण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी केवल जैन यांनी बुधवारी भर उन्हाच्या कडाक्यात फिल्डवर जाऊन माहिती घेतली.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी पदभार घेतल्यानंतर तात्काळ पाणीटंचाईची बैठक घेतली. त्यानंतर शिक्षण व आरोग्य सेवेवर लक्ष केंद्रित केले. आषाढी यात्रा तोंडावर असल्याने यात्रेच्या तयारीसाठी लागणाऱ्या गोष्टींची माहिती घेण्यासाठी बुधवारी त्यांनी पालखी सोहळा मार्गावर प्रत्यक्ष भेट देऊन माहिती घेतली. सोलापूर जिल्ह्यात साताऱ्याहून येणाऱ्या पालख्यांचा मार्ग व मुक्कामाच्या ठिकाणी करण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची त्यांनी यावेळी माहिती घेतली. पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांना आणखी कोणत्या सोयी व सुविधा उपलब्ध करता येतील याची त्यांनी बारकाईने माहिती घेतली. गतवर्षी वारी काळात पाऊस होता. त्यामुळे पालखी मार्गावर मुक्कामाच्या ठिकाणी वारकऱ्यांसाठी जर्मन हँगरची सुविधा देण्यात आली. ही सुविधा आणखी कशी वाढवता येईल. यंदाही पाऊस असेल की उन्हाचा तडाखा. यातून वारकऱ्याची आणखी काय सोय होईल याचा अचूक अंदाज घेण्यात आला.
माळशिरस तालुक्यातील दहिगाव व धर्मपुरी येथे जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी जैन यांनी सकाळच्या सत्रात भेट देऊन माहिती घेतली. धर्मपुरी येथे साईप्रसाद उद्योग समूहाचे अध्यक्ष शरद मोरे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी व इतर अधिकारी उपस्थित होते. सीईओ जैन यांनी उन्हाच्या कडाक्यात फिल्डवर जाऊन पालखी सोहळ्याच्या मार्गाची माहिती घेणे सुरू केले आहे.
पालखी मार्ग पाहणी
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस व पंढरपूर तालुक्यातील संत श्री.संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरील धर्मपुरी, खुडूस , कारूंडे, सदाशिवनगर, पुरंदावडे, वेळापूर वाखरी, भंडीशेगाव तर संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील पिराची कुरोली, महाळुंग, बोरगाव, अकलूज, माळीनगर या पालखी मार्गाची व पालखी तळाची पाहणी आज सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी केली. त्यांचे समवेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, पंढरपूर चे गटविकास अधिकारी अमोल जाधव , माळशिरस पंचायत समिती गटविकास अधिकारी रघुनाथ पांढरे, जिल्हा कक्षातील वैभव आहाळे उप अभियंता बांधकाम, उप अभियंता पाणी पुरवठा, विस्तार अधिकारी, सरपंच , पंचायत अधिकारी उपस्थित होते. पालखी मार्गावरील पालखी तळ, पिण्याच्या पाण्याच्या सुविधा, मुख्य मंत्री वारकरी निवारा कक्ष,रस्ते , शौचालय व स्नानगृह सुविधासाठी ची जागा, पालखी तळाची स्वच्छता, पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत या बाबत ची माहिती घेऊन त्या संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना सुचना दिल्या.
सिईओ कुशल जैन यांनी पायी फिरून सर्व पालखी मुक्कामाची ठिकाणे व विश्रांती ची ठिकाणांची पाहणी केली.

More Stories
बा विठ्ठला… वारकऱ्यांच्या सेवेसाठी अंगी बळ दे; सीईओ कुशल जैन यांनी घेतले विठ्ठलाचे दर्शन
मी शेतकऱ्याचा मुलगा, इनोव्हासाठी कशाला हट्ट करेन…
रोसाच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी संजय धनशेट्टी