सोलापूर :जिल्हा परिषदेचे सीईओ कुशल जैन यांनी बुधवारी पंढरपुरातील श्री विठ्ठल मंदिरात जाऊन विठ्ठल रूक्मिणी मातेचे दर्शन घेतले.
याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, गटविकास अधिकारी अमोल जाधव, अधिक्षक शहाजहान शेख उपस्थित होते. या प्रसंगी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीचेवतीने व्यवस्थापक प्रविण घम यांनी सिईओ कुशल जैन यांचे स्वागत व सलमान केला. आषाढी वारीच्या तयारीच्या अनुषंगाने कार्यकारी अधिकारी यांनी पंढरपूर, माळशिरस तालुक्याचा दौरा केला. दौऱ्याची सुरुवात त्यांनी पंढरपुरापासून केली. पांडुरंगाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी आषाढीवारी यशस्वी करण्यासाठी व वारकऱ्यांची सुविधा पुरवण्यासाठी श्री विठ्ठलाला साकडे घातले. दौऱ्याचा समारोप करताना पंढरपुरातील 65 एकरातील वारकरी निवासातील सोयी सुविधांची पाहणी केली. पालखी मार्गावर करण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची माहिती अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी दिली.

More Stories
झेडपीच्या गुरुजीचा आत्मदहनाचा इशारा; कारण ऐकून तुम्ही व्हाल चकित
हातात कात्री, मनात जिद्द अन् डोळ्यांत स्वप्न; अभिमन्यूंच्या सलूनने बदलली जगण्याची दिशा
बापरे… धो धो बरसणार परतीचा पाऊस