सोलापूर : शालेय शिक्षण विभागाने दिव्यांग व एनएमएमएस शिष्यवृत्तीच्या अर्जाला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे, अशी माहिती योजना विभागाचे शिक्षण संचालक महेश पालकर यांनी दिली.
एनएमएमएस व दिव्यांग शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत होती ती आता पुन्हा ३१ डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. त्याचबरोबर शाळास्तर पडताळणीची15 डिसेंबरपर्यंत मुदत होती ती आता 15 जानेवारीपर्यंत वाढवली आहे. जिल्हास्तर पडताळणीची 31 डिसेंबरपर्यंत मुदत होती ती आता 31 जानेवारीपर्यंत वाढवली आहे. अजूनही या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करायचे कोणी राहिले असल्यास त्यांनी तातडीने आपला अर्ज सादर करावा.
दोन डिसेंबर रोजीची अर्जांची स्थिती: NMMSS
Fresh- 8905 out of 11682.
Renewal- 19745 out of 30541
Disability
Fresh- 421
Renewal – 83 out of 236