सोलापूरजिल्हा परिषद
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी झेडपीचे कर्मचारी झाले आनंदित
पंढरपुरात प्रशिक्षणास झाला प्रारंभ

सोलापूर : नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सुरू झालेल्या उपक्रमाने जिल्हा परिषदेचे कर्मचारी आनंदीत झाले आहेत.
मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी पंढरपुरात कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याच्या पहिल्या वर्गाला प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील व प्रशिक्षक उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी जिल्हा परिषदेचे प्रशासन गतिमान करण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचा संकल्प केला होता त्याप्रमाणे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासूनच या उपक्रमाला सुरुवात झाली. प्रशिक्षणात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांना कामकाजाच्या अनुषंगाने विविध टप्प्याचे उजळणी मार्गदर्शन घेतले जाणार आहे. त्यामुळे कर्मचारी आनंदित झाले आहेत.