सोलापूरआरोग्यजिल्हा परिषद

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी डीएचओ नवले यांना दिले ‘चॉकलेट”

डीपीसीत आमदाराच्या संतापानंतर मिळाला दिलासा

सोलापूर : काय म्हणता… जिल्हा नियोजन समितीच्या सभेत आमदाराच्या संतापाला कारणीभूत ठरलेले जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी चॉकलेट देऊन अभिनंदन केले आहे.

गेल्या गुरुवारी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची सभा झाली होती या सभेत जिल्ह्यात कोट्यावधी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या अनेक आरोग्य केंद्राचे कामकाज सुरू झाले नसल्याबाबत आमदारांनी संताप व्यक्त केला होता जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर नवले यांच्या उत्तरावर समाधान न झालेल्या माजी आरोग्य मंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांनी तर चक्क बदला असा संताप व्यक्त केला होता डीपीसीतील या प्रकरणाची चर्चा होत असतानाच मंगळवेढा दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी मात्र जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नवले यांना चॉकलेट देऊन अभिनंदन केले आहे त्याला कारणही तसेच घडले आहे.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पंढरपूर तालुक्यातील रांजणी येथील नव्याने बांधण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची रविवार दिनांक 31 डिसेंबर रोजी पाहणी केली. आरोग्य केंद्राची मुख्य इमारत व कर्मचारी निवासस्थान पाहिल्यावर  पालकमंत्री पाटील यांनी आरोग्य विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभाग महाराष्ट्रात (RCH, आभा , गोल्डन कार्ड, सर्व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांमध्ये ) द्वितीय क्रमांकावर असल्याबद्दल सर्वांचे कौतुक केले. पालकमंत्री पाटील यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या कामकाजाबद्दलसमाधान व्यक्त करून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संतोष नवले व त्यांच्या सर्व टीमचे चॉकलेट देऊन अभिनंदन केले. यापुढेही सोलापूर जिल्हा कामामध्ये अग्रेसर ठेवा अशी सूचना त्यांनी केली. याप्रसंगी त्यांच्यासोबत आमदार समाधान अवताडे, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले गटविकास अधिकारी प्रशांत काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ एकनाथ बोधले, वैद्यकीय अधिकारी ,आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेवी कार्यकर्ता उपस्थित होत्या. डीएचओ नवले यांना आमदारांच्या  डोसनंतर पालकमंत्री पाटील यांनी दिलेल्या चॉकलेटची सध्या जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button