
सोलापूर : अरे, आज सोलापुरातील रस्त्यावर शुकशुकाट दिसत आहे. सोलापुरात असं घडलं तरी काय? काय म्हणता… सोलापुरातील मंडळी गावाकडे गेली आहेत. होय, वेळा अमावस्यानिमित्त गाव शिवार माणसांनी फुलून गेली आहेत.
सोलापुरात रस्त्यावर दररोज जाणवणारी वर्दळ आज कमी दिसत आहे. निमित्त आहे वेळा आमावश्या सणाचे. वेळा अमावस्यानिमित्त आज गावशिवार फुललेली दिसून येत आहेत. शहरातील बरीच मंडळी पांडव पूजेसाठी आपल्या शेतावर व मित्रांच्या फार्महाऊसवर गर्दी केल्याचे दिसून येत आहे. दर्शवेळा अमावस्या शेतकऱ्यांच्या जीवनातील मोठा सण आहे. आज शेतकरी सहकुटुंब शेतावर जाऊन पांडवपूजा करून ‘खज्जी-भजीचा” चा आस्वाद घेताना दिसून येत आहेत. त्यामुळे शिवारात ‘चांगभलं.. चांगभलं… असा आवाज घुमत आहे यंदा ज्वारीचे पीक जोमात आल्याने शेतकऱ्यांच्या आनंदाला भरते आले आहे. त्यामुळे मित्रमंडळीसह भोजनाचा कार्यक्रम शिवारात मोठ्या जोमाने सुरू आहे. त्यामुळे शहरातील बरीच मंडळी आज शेतावर गेल्याचे चित्र दिसून येत आहे.