
- सोलापूर : गेल्या दोन दिवसाच्या ढगाळी हवामानानंतर सोलापुरात आत्ता पावसाला सुरुवात झाली आहे.
हवामान खात्याने सात ते नऊ जानेवारी दरम्यान पावसाचा इशारा दिला होता त्याप्रमाणे गेले दोन दिवस सोलापूर जिल्ह्यात ढगाळी हवामान आहे. मंगळवारी काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली होती. गेले दोन दिवस जिल्ह्यात सूर्यदर्शन दुरापास्त झाले आहे. बुधवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास सोलापुरात पावसाचा जोरदार सडाका झाला आहे. त्यानंतर पुन्हा रात्री पावणे दहा वाजता पावसाला सुरुवात झाली आहे. नागरिक गुरुवारी होणाऱ्या वेळा अमावस्येची तयारी करीत आहेत. अशात पावसाचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. रब्बी ज्वारी व द्राक्ष शेतकऱ्यांना या पावसाचा मोठा फटका बसण्याची चिन्हे दिसत आहेत.