सोलापूर : शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सोलापूर जिल्ह्यातील झरे येथील सहावीत शिकणाऱ्या श्रद्धा पवार हिचे कौतुक केले आहे.
- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथे 51 वे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन सुरू आहे. या प्रदर्शनात राज्यभरातील जिल्हास्तरावरून निवड झालेले विज्ञान प्रयोग मांडण्यात आलेले आहेत. या विज्ञान प्रयोगाला शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी भेट दिली. या विज्ञान प्रयोगात झरे येथील नामदेवराव जगताप माध्यमिक विद्यालयात सहावीत शिकणारी श्रद्धा पवार हिने आपला प्रयोग सादर केला आहे. शालेय शिक्षणमंत्री केसरकर यांनी पवार हिचा वैज्ञानिक प्रयोग पाहिला व तिचे, प्रयोगासाठी मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे कौतुक केले. शिक्षणमंत्र्यांनी पवार हिचे कौतुक केलेला व्हिडिओ प्राथमिक शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांनी आपल्या स्टेटसवर शेअर करून तिचे अभिनंदन केले आहे. त्यामुळे आता पवार हिच्या प्रयोगाचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.

More Stories
सोलापूर झेडपी पदाधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वागत
पंढरपूर कॉरिडॉरचे काम कोणावरही अन्याय न करता योग्य पुनर्वसन करून पूर्ण करणार
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘निर्मलवारी-समृद्धवारी’ व ‘चरणसेवा’ उपक्रमाचा समारोप