सोलापूर : इस्लामी संस्कृतीचा महान सण रमजान ईद (ईद-उल-फित्र)मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. सकाळी नमाज पटणानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा व्यक्त केल्या.
मुस्लीम बांधवांनी रमजान पर्वचे तीस निर्जळी उपवास बुधवारी पूर्ण केले. संपूर्ण महिना धार्मिक कार्यासाठी समाजबांधवांनी वाहून दिलेला होता. अधिकाधिक वेळ अल्लाच्या उपासनेसाठी (ईबादत) देण्याचा प्रयत्न केला जात होता.बुधवारी चंद्रदर्शन घडले आणि इस्लामी महिना रमजानची सांगता होऊन ‘’शव्वाल’’ महिन्याला प्रारंभ झाला. या इस्लामी महिन्याच्या १ तारखेला गुरुवारी सकाळी ईद साजरी करण्यात आली. पहाटेपासून मुस्लीम मोहल्ल्यांमध्ये ईदची लगबग दिसून येत आली.
मुस्लिम बांधव ईदच्या दिवशी ईदगाह मैदानात सकाळी विशेष नमाज अदा करतात. हा अत्यंत सौहार्द आणि आनंदाचा दिवस मानला जातो. नवीन कपडे परिधान करून सर्वजण एकमेकांना आलिंगन देऊन ईद मुबारक देतात. शिरखुर्मा, गोड पदार्थ करून हिंदू-मुस्लिम बांधवांना आमंत्रित केले जाते. दरवर्षीप्रमाणे शहरातील सर्व धार्मिक स्थळावर नमाज अदा करण्यात आली. या ठिकाणी शहर काझी यांनी आवाहन केले.
शिरखुर्म्याचा दरवळला खमंग
ईदचे ‘’शिरशिरखुर्मा” हे दुधापासून तयार केलेल्या पेयाचे आकर्षण असते . दूध, शेवया आणि सुकामेवा एकत्र करुन दूध आटवून हे तयार करण्यात येत असल्याने याचा सुगंध गुरुवारी सकाळी मुस्लीबहुल भागात दरवळलेला जाणवला. ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी घरी येणाऱ्या नातेवाईक, मित्र परिवाराचे शिरखुर्मा देऊन तोंड गोड करण्यात येत आहे. परंपरागत चालत आलेल्या या उपक्रमातून भाईचारा आणखीन घट्ट होताना दिसून येत आहे.
अल्लाह चे आभार
अल्लाहने रमजान महिन्यात संपूर्ण कुरान या जमिनीवर उतरविले.कुरानच्या माध्यमातून समस्त मानव जातीसाठी एकता,भाईचारा व शांततेचं संदेश दिला गेला आहे.आपण नशीबवान आहोत की अल्लाहने आमच्यासाठी आजचा दिवस ईदच्या माध्यमातून दिला. ज्यामुळे कोणीही ना गरीब आहे ना कोणी अमीर; सर्व ईद दिवशी एकाच वेळी एकाच लाईन मध्ये सर्वसमान कोणताही भेदभाव न ठेवता अल्लाहसाठी नतमस्तक होतात.जगात शांतता व अखंडता कायम राहो हीच अल्लाहकडे दुआ ( प्रार्थना)
हाफीज सय्यद मोहम्मद
आदिलशाही ईदगाह
जुनी मिल मैदान, सोलापूर
* बातमीसाठी सहकार्य: इमरानभाई सगरी