सोलापूर : मूळचे सोलापूरचे असलेल्या प्रशांत मोहन कांबळे यांची फौजदारवरून सहायक पोलीस निरीक्षकपदी पदोन्नतीवर मुंबईतील लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात नियुक्ती झाली आहे.
सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत कांबळे हे मूळचे सोलापूरचे आहेत. त्यांचे वडील मोहन कांबळे हे सोलापूर शहर पोलीस दलात हवालदार होते. सन २०१४ मध्ये प्रशांत कांबळे हे राज्यसेवा परीक्षेद्वारे फौजदार म्हणून नियुक्त झाले. मुंबईत कॉफर्ड पोलीस ठाण्यात काही काळ त्यांनी काम केले. आत्ता सहायक पोलीस निरीक्षक पदावर लो टी. मार्ग पोलीस ठाण्यात नियुक्ती झाल्याने सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
सोलापूरचे प्रशांत कांबळे पदोन्नतीवर मुंबईत झाले एपीआय

More Stories
अंकुश चव्हाण यांना लष्कराकडून ‘दक्षिणी कमान सरसेनापती पदक’
“कास्ट्राईब’ च्या मागणीकडे सोलापूर झेडपी प्रशासनाची डोळेझाक
जिल्हा परिषदेत पदाधिकारी निवडीपेक्षा जयकुमार गोरे यांच्या पॅटर्नची चर्चा