सोलापूर : शिक्षण विभागाच्या योजनाचे संचालक महेश पालकर यांनी सोलापूर योजना कार्यालयास भेट देऊन सर्व योजना आणि उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमाचा आढावा घेतला. अक्कलकोट, करमाळा, माढा आणि सांगोला तालुक्याचे अभिनंदन केले तर बाकी तालुक्याना उद्दिष्ट दिल्याप्रमाणे तात्काळ २० डिसेबरपर्यंत असाक्षर नोंदणी पूर्ण करण्याचे आदेश दिले. मंगळवेढा तालुक्याने अव्वल काम केल्याने विशेष कौतुक करण्यात आले.
संचालक पालकर यांनी Each one teach one याप्रमाणे सर्व असाक्षर यांना ८ वी ते १० वीचे विद्यार्थी स्वंयसेवक म्हणून जोडून द्यावेत. भविष्यात या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेसाठी फायदा होईल. २ फेब्रूवारी 2025 मध्ये होणाऱ्या FLNAT चाचणीपर्यंत ही तयारी करून घ्यावी, असे आदेश दिले. सोलापूर जिल्ह्याच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. टीम वर्कमुळे सोलापूरची कामगिरी निश्चितच दिमाखदार होईल, अशी आशा आहे, असे मनोगतात सांगितले. विभागीय उल्लास मेळाव्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या विशेषतः मंगळवेढा तालुका सहभागासाठी कौतुक केले. या सर्व बाबीसाठी सर्व गटशिक्षणाधिकारी,नोडल अधिकारी आणि साधनव्यक्ती यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख, योजना शिक्षणाधिकारी सुलभा वठारे,तालुक्यांचे गटशिक्षणाधिकारी, साधनव्यक्ती हजर होते. या दौऱ्यात संचालक पालकर यांनी सोशल हायस्कूलला भेट दिली व सर्व योजनाचा आढावा घेतला. उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रममध्ये प्रभावी काम करण्याचे आदेश दिले. याचप्रमाणे अद्यापही उद्दीष्ट पूर्ण न केलेल्या शाळांचे मुख्याध्यापक यांची सभा घेऊन आढावा घ्यावा आणि उद्दीष्ट पूर्ण करून घ्यावे, अशा सूचना केल्या.