सोलापूर : काही व्यक्ती पदाने फक्त मोठ्या असतात. या मोठेपणाच्या अविर्भावत त्यांना कोणाशी कसे वागावे हेही कळत नाही. याचा प्रत्यय जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागाच्या कार्यालयात सोमवारी आला. कैफियत मांडण्यासाठी आलेल्या जिल्हा परिषद शाळेतील मुलांना शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी भेट नाकारल्याने संतापाचा सूर पालकांमध्ये उमटला आहे.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात सध्या अक्कलकोट शिक्षण विभाग चर्चेत आहे. गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या हट्टासाठी मैंदर्गी जिल्हा परिषदेच्या मुख्याध्यापकावर कारवाई करण्यात आली आहे. गावात गेल्या काही दिवसापासून याची चर्चा सुरू असून यामुळे शाळेचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे वैतागलेले पालक व विद्यार्थ्यांनी सोमवारी जिल्हा परिषद गाठली. मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांची भेट घेऊन कैफियत मांडण्याची त्यांची इच्छा होती पण सीईओ जंगम जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीला गेले असल्याने त्यांचे भेट होऊ शकली नाही. त्यामुळे वाट पाहून पालकांनी शिक्षणाधिकारी कादर शेख यांची केबिन गाठली. आमच्या मुलांची कैफियत ऐकून घ्या असा पालकांनी हट्ट धरल्यावर निवेदन स्वीकारून शिक्षणाधिकारी शेख यांनी मुलांची भेट घेणे टाळले. माझ्याकडे कशाला आलात? तुमचे माझ्याकडे काय काम आहे? असे म्हणत त्यांनी सर्वांना आल्या पावली परत पाठवले. शिक्षणाधिकाऱ्यांनी भेट नाकावरून कैफियत ऐकून न घेतल्यामुळे त्या विद्यार्थ्यांना रडू कोसळले. या विद्यार्थ्यांची आज शैक्षणिक सहल जाणार होती. विमानाने प्रवास करण्याची संधी हुकल्यामुळे त्यांना रडू कोसळले. राजकीय साठमारी व प्रशासनाच्या लाल फितीत विद्यार्थ्यांच्या भविष्यावर घाला घालण्यात आल्यामुळे पालकांनी संताप व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *