सोलापूर : जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना भेटण्यास आलेल्या अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी येथील जिल्हा परिषद कन्नड शाळेच्या त्या मुलींना मंगळवारी दमदाटी करण्यात आली आहे. चॉकलेट खाऊन तुमचं पोट भरणार आहे काय? तुम्हाला सोलापूरला कोण आणलं होतं असा जबाब काही अधिकाऱ्यांनी घेतल्याचे तक्रार त्या मुलींनी केली आहे.
जिल्हा परिषदेत सोमवारी मैंदर्गी येथील काही पालक व जिल्हा परिषदेच्या कन्नड माध्यमाच्या शाळेतील मुली आल्या होत्या. शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी त्यांची भेट घेणे टाळले. प्रकरणाची चौकशी चालू असल्याचा खुलासा त्यांनी केला आहे. असे असेल तर मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी याच प्रकरणात श्री सदस्य चौकशी समिती नेमून गटशिक्षणाधिकाऱ्याची चौकशी सुरू केली आहे. ही चौकशी प्रलंबित असताना मुख्याध्यापकावरच का कारवाई करण्यात आली असा संतप्त सवाल पालकांचा आहे. पालक व विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेत आल्यामुळे तालुकास्तरावरील कामकाज ढवळले आहे. आता आपल्यावर काहीतरी कारवाई होईल या भीतीपोटी तेथील वरिष्ठांनी मंगळवारी त्या शाळेत जाऊन मुलांना दमदाटी केल्याची तक्रार समोर येत आहे. तुम्हाला चॉकलेट कशाला पाहिजे. सोलापूरला तुम्हाला कोणी नेले, अशी चौकशी करण्यात आल्याचे त्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी शेअर केलेल्या व्हिडिओतून समोर आले आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभाग चुकामध्ये सुधारणा करणार आहे की सोडाची वागणूक पुढे चालू ठेवणार आहे हे कळेनासे झाले आहे. बालहक्क अभियानापर्यंत हे प्रकरण जाण्याआधी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून तोडगा काढावा अशी मागणी पालकांनी केली आहे.
त्या मुली कन्नड मध्ये काय म्हणतात…
पहा व्हिडिओ