सोलापूरसंघटना-संस्थासण- उत्सव

बाबासाहेबांच्या सोलापूर भेटीतील आठवणींच्या पुस्तकाचे वाटप

झेडपी कर्मचारी मराठा सेवा संघ शाखेच्यावतीने राबवला उपक्रम

सोलापूर : महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सोलापूरला दिलेल्या भेटीच्या आठवणी संकलित केलेल्या पुस्तकाचे झेडपी कर्मचारी मराठा सेवा संघ शाखेतर्फे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या भीमगीतांच्या कार्यक्रमाला जोरदार प्रतिसाद मिळाला.

जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, शिक्षणाधिकारी कादर शेख, जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मिनाक्षी वाकडे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुलोचना सोनवणे, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी, कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे अरूण क्षिरसागर, मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे अशोक इंदापुरे, शंतनु गायकवाड, मराठा सेवा संघाचे शाखाध्यक्ष अविनाश गोडसे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, अनिल जगताप, सुर्यकांत मोहिते, शिवानंद मगे, कास्ट्राईब चे राज्य उपाध्यक्ष गिरीष जाधव उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी उमाकांत राजगुरू, भगवान चव्हाण, संजय कांबळे, रामदास गुरव, चेतन भोसले, नागनाथ धोत्रे, कल्याण श्रावस्ती, चंद्रकांत होळकर, योगेश कटकधोंड, कर्मचारी महासंघांचे कार्याध्यक्ष दिनेश बनसोडे, समाज कल्याण विभागाचे अधिक्षक सचिन सोनकांबळे, विस्तार अधिकारी मनोज म्हेत्रे, स्वाती गायकवाड यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास अमृत कोकाटे, किशोर सावळे, समता सैनिक राजश्री कांबळे उपस्थित होते. कास्ट्राईब कर्मचारी संघटनेच्या वतीने मिठाईचे वाटप अतिरिक्त सिईओ संदीप कोहिणकर यांच्या हस्ते करणेत आले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सोलापूरला दिलेल्या भेटींचा वृत्तांत संकलित केलेल्या लेखक दत्ता गायकवाड लिखित “चैतन्याचे प्रणेते डाॅ. बाबासाहेब आंबेडकर’ हे पुस्तक मराठा सेवा संघाच्यावतीने यावेळी उपस्थितना वितरित करण्यात आले.

भीमगीतांनी दणाणले सभागृह 

या निमित्ताने आयोजित भीमगीतांच्या कार्यक्रमात “दोनच राजे इथे गाजले..’ या गिताने कार्यक्रमात बहार आणली. माऊलीची माय होता…माझा भिमराव…!, तसेच जन्मास आले भिमबाळ.., माझ्या भिमाच्या नावाचं कुंकू लावीलं,  किती शोधला असता भीम नोटांवर या भीमगितांनी जिल्हा परिषदेचे यशवंतराव चव्हाण सभागृह दणाणून गेले. मराठा सेवा संघाच्या वतीने स्वानंद परिवाराच्या पहाडी आवाजात भीमगितांचे सादरीकरण केले. गायक रूपेश क्षिरसागर, किरणकुमारी गायकवाड, महेश कोटीवाले, अरुंधती सलगर, सायली साठे, हेमलता होटकर, कालिंदा देशमुख, एकनाथ कुंभार यांनी या कार्यक्रमाचे सादरीकरण केले. शेवटी इतनी शक्ती हमे दे ना दाता, हे गीत लक्ष्मी नागणसुरे यांनी गायले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button