सोलापूर : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात जमलेल्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व ग्रामीण पोलीस अधीक्षक या तीन अधिकाऱ्यांनी मोठी धावपळ केल्याचे दिसून आले आहे.
यंदाच्या आषाढी वारीला विक्रमी गर्दी झाली होती. आषाढी एकादशी दिवशी पंढरपुरात जवळपास 28 लाख वारकरी आल्याचे ड्रोनद्वारे केलेल्या Ai सर्वेक्षणात दिसून आले आहे. आषाढी वारी सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम या दोन आयएएस अधिकाऱ्यांनी व सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी मोठे परिश्रम घेतले आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सुरुवातीपासूनच आषाढी वारीच्या नियोजनावर भर दिला. पंढरपुरातील सोयी सुविधा बरोबरच आधुनिक तंत्राचा वापर करून गर्दीचे नियंत्रण कसे करता येईल याचे नियोजन केले. पालखी सोहळा मार्गावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी नेटके नियोजन केले. यासाठी हे दोन्ही अधिकारी सतत पालखी मार्ग व पंढरपुरात फेरफटका मारत होते आषाढी वारीच्या दिवशी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे एका पोलीस शिपायाच्या मोटरसायकलवर बसून गर्दी व वाहतुकीच्या नियोजनाला मदत करीत असताना दिसून आले आहेत. पंढरीतील नवापूर व नदीच्या दगडी पुलावर स्वतः पायी भरून वारकऱ्यांची जिथे गर्दी जमते तिथे सूचना करण्याचे काम त्यांनी स्वतः केले. त्यांच्यासोबतच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम हे होते आषाढी वारीच्या गर्दीचा पहिला अनुभव त्यांनी घेतला. या दोघांनी चंद्रभागेच्या पात्रातील पाण्यातून होडीतून फिरून गर्दीचा अंदाज घेतला. वाहतुकीचे नियोजन करणे, अपघात टाळणे, चेंगराचेंगरी टाळणे या गोष्टीवर त्यांनी चांगलाच भर दिल्याचे दिसून आले. यासाठी त्यांना जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, प्रांताधिकारी सचिन इथापे, मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ औसेकर महाराज यांचे चांगले सहकार्य लाभले.
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनीही गर्दीचे नियोजन चांगल्या प्रकारे केले. मंदिर परिसरात वारकऱ्यांचे चेंगराचेंगरी होऊ नये म्हणून दोरखंडाच्या मदतीने गर्दीचे नियोजन केले. अचानक वाढलेल्या गर्दीमुळे ट्रॅफिक जामचे समस्या निर्माण झाली. यावर मात करीत वाहतुकीचे चांगल्या प्रकारे नियोजन केले. राज्य राखीव मंडळाच्या बसना मार्ग उपलब्ध करून दिला. यासाठी त्यांना पंढरपूरचे उपाध्यक्ष भोसले, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तय्यब मुजावर, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक जगताप यांची चांगलीच मदत झाली.
मुख्यमंत्र्यांनी केला सन्मान
आषाढी यात्रा कालावधीत सर्व संताच्या पालखी मार्गावर व पंढरपूर शहरात भाविकांसाठी खास सुविधा देऊन उत्कृष्ठ काम केलेबद्दल जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेहस्ते गौरव करणेत आला.पंढरपूर पंचायत समितीच्या प्रांगणात झालेल्या निर्मलदिंडीच्या समारोप समारंभात या दोघांना प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करणेत आला. यावेळी कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, मंत्री जयकुमार रावल, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, विभागीय आयुक्त डाॅ. चंद्रकांत पुंडकुलवार, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, आमदार समाधान आवताडे, आमदार अभिजित पाटील, आमदार सचिन कल्याणशेट्टी,आमदार देंवेद्र कोठे, जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवाडे, उप सचिव डाॅ. पदमश्री बायनाडे, सचिव अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, विशेष कार्यकारी अधिकारी दादासाहेब कांबळे, विशेष कार्यकारी अधिकारी महादेव घुले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन ) स्मिता पाटील, महिला बाल कल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकिले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता ) अमोल जाधव, प्रणव परिचारक, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी,गटविकास अधिकारी सुशिल संसारे, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज राऊत उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करणेसाठी कनिष्ठ प्रशासन अधिकारी सचिन सोनकंबळे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव,अधिक्षक अविनाश गोडसे, झेड ए शेख, अधिक्षक शहानवाज तांबोळी, सचिन सोनवणे, शंकर बंडगर, यशवंती धत्तुरे, अर्चना कणकी, महादेव शिंदे, प्रशांत दबडे, अल्फीया बिराजदार, सुजाता साबळे, तेजस्विनी साबळे, आनंद मोची, रत्नदीप फडतरे यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन ऐश्वर्या हिब्बारे यांनी केले तर प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे यांनी आभार मानले.

More Stories
‘स्टॉप कॅन्सर’ कार्यशाळेत महिलांना मिळाले कॅन्सर प्रतिबंधासाठी ज्ञान
ट्रेनिंग सेंटरमध्ये बेकायदा बदली; त्या बदल्यात घर बांधून घेतले
सोलापूर मिनी मंत्रालयाची चावी महिलांच्या हाती; “सोलापूर समाचार’ चे वृत्त तंतोतंत खरे ठरणार