सोलापूरजिल्हा परिषदशिक्षण

माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी जागेवर दिली डिजिटल अनुकंपा नियुक्ती

सोलापूर : पुणे विभागात शिक्षकांच्या प्रश्नावर नेहमीच आक्रमक असणारे प्राचार्य बी पी रोंगे यांनी माध्यमिक शिक्षण विभागात ठाण मांडून दोन आदेश पारित करून घेऊन दोन शिक्षकांना न्याय दिला. यामुळे माध्यमिक शिक्षकांमध्ये आनंदाच् वातावरण आहे.

सातत्याने शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करणारे प्राचार्य बी. पी. रोंगे यांनी आपली तत्परता गुरुवारी दाखवून दिली. प्राचार्य रोंगे यांच्या सादास प्रतिसाद देत तेवढेच तत्पर असलेले माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी एक तासात चार ऑनलाइन मान्यता देऊन आपल्या कामाची चुणूक दाखवून दिली.

वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे प्रश्न निकाली काढणे साठी माध्यमिक शिक्षण विभागात गर्दी असते. प्राचार्य रोंगे यांनी अक्कलकोट तालुक्यातील शिक्षक नेते फरीद इमाम जमादार यांना सहशिक्षक पदावरून मुख्याध्यापक पदावर पदोन्नतीचा आदेश एक तासात पारित करून घेतला. तसेच टेंभुर्णी येथील कन्या प्रशालेत अर्जुन खटके या सहशिक्षकास रिक्त जागेवर नियुक्ती देण्याचा आदेश देण्यात आला.

३७ शिक्षकांचे प्रश्न एकाच दिवसात मार्गी

सोलापूर जिल्हा सेवा अभियान अंतर्गत प्राप्त निवेदनावर तातडीने कार्यवाही करणेसाठी शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सोलापूर यांना भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे प्रश्नाबाबत तातडीने उपाययोजना करणेचे सुचना दिल्या होत्या. त्यानुसार माध्यमिक शिक्षणाधिकारी जगताप यांच्या कार्यालयात गुरुवारी ही बैठक झाली.
यावेळी शिक्षक नेते प्राचार्य बी पी रोंगे,विभागीय समन्वयक सुरेश गुंड, सुभाष भिमनवरू, महेश घोंगडे, प्रशांत शिंपी यांनी उपस्थित राहून ३७ प्रश्न मार्गी लावणेसाठी विशेष प्रयत्न केले आहेत. त्यामध्ये बार्शी तालुक्यातील मुंगशी येथील संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील माध्यमिक विद्यालयात मेघा साखरे यांना अनुकंपा तत्वावर शिपाई पदावर नियुक्ती तर अन्य एका शिक्षकाचे पदोन्नती देण्यात आली. हे चार आदेश जागेवर देऊन माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी डिजीटल प्रणालीचा प्रत्यय आणून दिला. त्याबद्दल भाजप शिक्षक आघाडीतर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button