सोलापूरएसटी महामंडळ

सोलापुरात हिरकणी बसची ट्रकला धडक चालकासह महिला प्रवासी ठार

सोलापूर : मार्केट यार्डजवळील शेळगी ब्रिज येथे शुक्रवारी पहाटेच्या सुमारास एसटी बस आणि ट्रक यांच्यात अपघात झाला. या अपघातात एसटी चालक व प्रवासी महिला अशा दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून, दहा जण जखमी झाले आहेत.

दि. ३१ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास हा दुर्दैवी अपघात झाला. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची हिरकणी बस क्रमांक MH 14 LB 0380 ने समोरून जाणाऱ्या ट्रक क्रमांक MH 13 AX 3949 ला पाठीमागून जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, बसचा समोरील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. घटनास्थळी प्रवाशांच्या बॅग्ज रस्त्यावर पडलेल्या दिसल्या. यात बस चालक दादाराव भालचंद्र बनसोडे (वय ४३, रा. चिवरी, उमरगा, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) व प्रवासी महिला नागुबाई राम रेवगे (वय ४८, रा. अणदूर, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) अशा दोघांचा मृत्यू झाला.तर जखमींमध्ये रामचंद्र प्रभाकर देवघे वय वर्ष 57 राहणार अंदुर जिल्हा धाराशिव

2. विकास प्रकाश पाटील वय वर्ष 32 राहणार आळंद जिल्हा गुलबर्गा

3. माणिक नागप्‍पा वायचळ वय वर्ष 54 राहणार तांदूळवाडी तालुका दक्षिण सोलापूर.

4. रामलिंग ब्रह्मानंद कापसे वय वर्षे चाळीस राहणार धाराशिव. 5. अभिषेक दीपक चव्हाण वय वर्ष 25 राहणार उमरगा धाराशिव

6. अनिकेत सुभाष राठोड वय वर्ष 30 राहणार सातारा

7. अभिजीत अरुण चव्हाण वय वर्ष 44 राहणार नळदुर्ग जिल्हा धाराशिव

8. नागोराव किस्तू तोडसांग वय वर्ष 37 राहणार किणवर परभणी

9. अनुराधा अर्जुन चव्हाण वय वर्ष 60 राहणार तुळजापूर जिल्हा धाराशिव

10. तुलसीदास मनोहर पाचंगे वय वर्ष 49 राहणार गुंजोटी तालुका उमरगा जिल्हा धाराशिव यांचा समावेश आहे. सर्व जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच सोलापूर पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button