March 11, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

सीईओ कुलदीप जंगम यांनी ग्रामपंचायत पदभारती घोटाळ्याबाबत संघटनेकडे केला मोठा खुलासा

सोलापूर झेडपी भरती घोटाळा: भाग एक

सोलापूर समाचार विशेष 

राजकुमार सारोळे

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या पदभरतीत ग्रामपंचायत कोट्यातून भरण्यात येणाऱ्या दहा टक्के पदांमध्ये सन 2021 मध्ये घोटाळा झाल्याचा खुलासा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगरपरिषद कामगार युनियनचे सरचिटणीस दिलीप जाधव यांना दिलेल्या पत्रात स्पष्टपणे केला आहे. त्यामुळे संघटनेने घोटाळा झालाच नाही असा केलेला आरोप फोल ठरला आहे.

सोलापूर जिल्हा परिषद अंतर्गत 2023 च्या जाहिरातीच्या अनुषंगाने ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या दहा टक्के कोटा राखीव मधील 86 पदे व सन 2019 च्या जाहिरातीवरून 55 पदे जास्त भरती झाल्याचे दिशाभूल करणारे कारण सांगून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या दहा टक्के भरतीला ब्रेक लावल्याबद्दल महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत जिल्हा परिषद नगर परिषद कामगार युनियनने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक व एन. बी. बोरकर यांच्या खंडपीठाने चार जुलै रोजी निर्णय देत सोलापूर जिल्हा परिषदेने याबाबत आठ आठवड्यात निर्णय घ्यावा असे निर्देश दिले होते. त्यानुसार मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश व संघटनेचे पत्र प्राप्त होतात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी 25 ऑगस्ट रोजी संघटनेला जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत कोट्यातील दहा टक्के भरतीबाबत वस्तुस्थिती निहाय खुलासा केला आहे. यापूर्वीच्या पदभरतीत गडबड झाल्याचे त्यांनी संघटनेला कळविले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद दिशाभूल करीत असल्याचा संघटनेचा आरोप फोल ठरला आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी संघटनेचे सरचिटणीस दिलीप जाधव यांना दिलेल्या पत्रात पुढील बाबी स्पष्ट केले आहेत. ग्रामपंचायत कर्मचारी 10% भरती बाबत सन 2019 च्या जाहिरातीनुसार 54 पदे भरणे अपेक्षित आहे. पण या कोट्यातून यापूर्वीच 141 पदे भरण्यात आली आहेत. म्हणजेच सन 2023 च्या जाहिरातीनुसार 86 पदे यापूर्वीच जास्त भरण्यात आली आहेत. या भरतीबाबत ग्रामविकास विभागाचे आवर सचिव यांनी एक डिसेंबर 2022 मध्ये एक पत्र पाठवले आहे या पत्रात सन 2023 च्या येणाऱ्या जाहिरातीत डिसेंबर 2022 अखेर रिक्त होणाऱ्या पदांचा विचार करून सन 2019 मध्ये दाखविलेल्या पदांचा विचार करण्यात यावा असे सुचित केले आहे. यानुसार सन 2019 मध्ये भरण्यात आलेल्या दहा टक्के कोट्यातील पदांचा विचार केला असता सन 2023 च्या जाहिरातीच्या अनुषंगाने 86 पदे अपेक्षेपेक्षा जादा भरण्यात आली आहेत सन 2019 मध्ये 141 पदे भरण्यात आली होती त्यातून 86 पदे वजा केल्यावर आणखी 55 पदे अतिरिक्त ठरत आहेत त्यामुळे सन 2023 च्या जाहिरातीनुसार ही पदे भरता येणार नाहीत.  सीईओ जंगम यांच्या या खुलासामुळे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्या दहा टक्के कोट्याच्या कर्मचारी भरतीत यापूर्वी मोठा घोटाळा झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ही पदे कोणी व का भरली? त्यांच्यावर आता काय जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. याकडे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

सीईओ जंगम यांचे स्पष्टीकरण…