सोलापूर : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशाप्रमाणे दि. 14 डिसेंबर रोजी सोलापूर जिल्हयातील सर्व न्यायालयामध्ये चौथे राष्ट्रिय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये सोलापूर जिल्हयातील एकुण 19 हजार 831 प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्यात आली. लोकअदालतीच्या माध्यमातून 71 कोटी 5 लाख 14 हजार 605 इतके मुल्य असणा-या प्रकरणांमध्ये सांमजस्याने तडजोड करण्यात आली.
चौथ्या राष्ट्रीय लोकअदालतीचे उद्घाटन मो. सलमान आझमी (अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश) यांच्याहस्ते करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी जिल्हा न्यायाधीश जे. जे. मोहिते, जिल्हा सरकारी वकिल प्रदिपसिंग रजपूत, सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष अमित आळंगे, महानगरपालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर खिराडकर, राजन माने, भारतीय स्टेट बँकेचे वरिष्ठ शाखाधिकारी अनिकेत फले, विधीज्ञ व्ही. एन. देशपांडे आणि जिल्हा न्यायालय प्रबंधक पल्लवी पैठणकर, विधीज्ञ, पक्षकार उपस्थित होते.
सोलापूर जिल्हा न्यायालय तसेच सोलापूर जिल्हयातील सर्व तालुक्यातील न्यायालयामध्ये राष्ट्रीय लोकअदालत घेण्यात आले. राष्ट्रिय लोकअदालतमध्ये 44 हजार 201 प्रलंबित प्रकरणे, दाखलपुर्व 94 हजार 525 प्रकरणे ठेवण्यात आली होती. यापैकी प्रलंबित 5 हजार 62 प्रकरणांमध्ये तडजोड झाली आणि 14 हजार 769 दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीच्या पार्श्वभुमिवर निकाली काढण्यात आली.
राष्ट्रीय लोकअदालतमध्ये सोलापूर मुख्यालयाच्या ठिकाणी पॅनल प्रमुख म्हणून जिल्हा न्यायाधीश जे. जे. मोहिते, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर आर. यु. नागरगोजे, दिवाणी न्यायाधीश, एस. ए. आर. सैयद, दिवाणी न्यायाधीश, पी. पी. पेठकर, दिवाणी न्यायाधीश, न्यायदंडाधिकारी डी. डी. कोळपकर, न्यायदंडाधिकारी पी. व्ही. चव्हाण, न्यायदंडाधिकारी एस. पो. मर्डेकर, न्यायदंडाधिकारी व्ही. व्ही. रजपूत कुलकर्णी, न्यायदंडाधिकारी एस. पी. पाटील, न्यायदंडाधिकारी व्ही. एम. रेडकर, न्यायदंडाधिकारी व्ही. पी. कुंभार यांनी काम पाहिले. पॅनल सदस्य म्हणून लोकअभिरक्षक कार्यालयातील लोकरक्षक स्नेहल राऊत, एस. एम. झुरळे, एम. बी. सोलनकर, रेवण पाटील, जी. बी. नवले तसेच व्ही. व्ही. कुर्ले, डी. व्ही. किणगी, एस. आर. शेंडगे आदींनी काम पाहिले.
चौथे राष्ट्रीय लोकअदालत यशस्वी करण्याकरीता पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सोलापूर महानगरपालिका आयुक्त शितल तेली उगले, उपायुक्त आशिष लोकरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशादिन शेळकंदे, महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीचे अधिक्षक अभियंता सुनिल माने, शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर खिराडकर, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
स्पेशल ड्राईव्ह –
राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजनापूर्वी 9 ते 13 डिसेंबर या कालावधीमध्ये सोलापूर जिल्हयातील सर्व न्यायालयामध्ये विशेष मोहिम राबविण्यात आली. विशेष मोहिमेमध्ये 40 वर्षे जुनी : 2, 30 वर्षे जुनी: 3, 20 वर्षे जुनी: 1, 15 वर्षे जुनी: 24, 10 वर्षे जुनी: 128, 5 वर्षे जुनी: 880 व इतर अशी एकुण 3 हजार 300 प्रकरणे निकाली काढण्यात आली.
लोक न्यायालयाची यशस्वी गाथा-
लोक अदालत 14 डिसेंबर रोजी पॅनल कमांक 1 मध्ये एकूण 32 प्रकरणांची यशस्वी तडजोड झाली. विशेषतः एल.ए. आर. 103/2020 हे प्रकरण दि. 15 डिसेंबर 2020 रोजी दाखल होवून जिल्हा व सत्र न्यायाधीश 1 या न्यायालयात प्रलंबित होते. सदर प्रकरण हे रु. 1,32,93000/- या रक्कमेवर तडजोड झाली. या प्रकरणामध्ये एकूण 15 प्रतिवादी होते त्यांच्यामध्ये त्यांच्या वैयक्तिक हिश्यांच्या वाटणीसाठी बराच काळ प्रकरण प्रलंबित होते. हे प्रकरण लोक न्यायालयाकडे सादर करण्यात आले. हे प्रकरण लोक न्यायालयामध्ये तडजोड होवून सर्व प्रतिवादींनी भूसंपादन संदर्भ कमांक १०३/२०२० ची तडजोड रक्कम रु. 1,32,93000/- त्यांच्या सहमतीने केलेल्या हिश्यांच्या प्रमाणात विभागणी झाली.
त्याने पत्नीला स्वीकारले
एम. पी. एस. सी. स्पर्धा परिक्षेची तयारी करणारा तरूण व त्याच्या पत्नीमध्ये गैरसमजातून झालेल्या वादाचे रूपांतर 9 महिने एकमेकांपासून वेगळे राहण्यात झाले व परिणामी घटस्फोटापर्यंत येवून ठेपलेल्या प्रकरणात समूपदेशनाने व समोपचाराने केलेला प्रयत्नाला यश आले. यात दोघांनी त्यांच्या मुलीचे भविष्य व स्पर्धा परिक्षेकरिता लागणारे तणाव मुक्त वातावरण याचा सखोल विचार करून एकत्र येण्याचा निर्णय घेवून एकमेकांविरूद्धचे सर्व वाद व अर्ज लोकअदालत मध्ये मागे घेवून एकत्र नांदण्यास गेले.
शेतकरी पती व गृहीणी असलेली पत्नी व तीन अपत्ये जे सुमारे चार वर्षांपासून किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एकमेकांपासून विभक्त राहत होते. समूपदेशानाने व समोपचाराने त्यांच्यात मनोमिलन घडवून त्यांच्या व त्यांच्या मूलांच्या भविष्याचा विचार रूजवील्याने त्यांनी सारासार विचार करून एकमेकांविरूद्धचे सर्व हेवे दावे लोक अदालतमध्ये मागे घेवून एकत्र नांदण्यास गेले.
सुमारे सात वर्षांपूर्वी झालेल्या एका उच्च शिक्षित डॉक्टरेट प्राध्यापकाचे झालेले लग्न. वैचारिक मतभेदातून ते पती-पत्नी विभक्त राहिले. समूपदेशानाने व समोपचाराने त्यांच्यात मनोमिलन घडवून त्यांच्या भविष्याचा विचार रूजवील्याने त्यांनी सारासार विचार करून एकमेकांविरूद्धचे सर्व अर्ज व दावे लोक अदालतमध्ये मागे घेवून एकत्र नांदण्यास गेले.
ठाणे स्थित कॉपॅरिट क्षेत्रातील पती व गृहीणी असलेली पत्नी जे सुमारे एक वर्षांपासून शुल्लक कारणावरून एकमेकांपासून विभक्त राहत होते समूपदेशानाने व समोपचाराने त्यांच्यात मनोमिलन घडवून भविष्याचा विचार रूज्वील्याने त्यांनी सारासार विचार करून एकमेकांविरूद्धचे सर्व हेवेदावे लोक अदालतमध्ये मागे घेवून एकत्र नांदण्यास गेले. आर्थिक व दिवाणी वादा बरोबरच कौटुंबिक वादाची ही प्रकरणे सामोपचाराने मिटल्याने सदस्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.