सोलापूर : सोलापूर इंडियन मॉडेल स्कूलमधील सई राजकुमार सारोळे हिने दहावीच्या परीक्षेत 96. 60 तर सिद्धी सचिन घोडके हिने 97.60 टक्के गुण घेऊन घवघवीत यश संपादन केले.
इंडियन मॉडेल स्कूलचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. यात 90 टक्केच्यावर गुण असलेले 82 विद्यार्थी आहेत. सई सारोळे हिने क्लास न लावता यश संपादन केले आहे. त्याबद्दल तिचे इंडियन मॉडेल स्कूलचे सचिव अमोल जोशी, संचालिका सायली जोशी, प्राचार्य सुजाता बुट्टे यांनी अभिनंदन केले आहे. सई हिची अभ्यासातील चिकाटी पाहून वर्गशिक्षक माधुरी कुलकर्णी, सुरेखा होलीकट्टी, पल्लवी कुलकर्णी, अनुराधा खोत, कविता यादव, रुपाली जम्बगे, जेऊरे, शीरशीकर,पेरला, नितीन देशपांडे यांनी वेळ देऊन वैयक्तिक मार्गदर्शन केले. गणितासाठी ऋचा देवस्थळी यांनी आपला वेळ काढून तिच्यासाठी खास मदत केली. इंडियन मॉडेल स्कूल मध्ये हर्षदा व ऐश्वर्या कोमती भगिनीने पहिला व दुसरा क्रमांक येण्याचा मान पटकावला. सिद्धी घोडके हिने 97. 60 टक्के गुण मिळवले. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांचे स्वीय सहाय्यक सचिन घोडके यांची ती कन्या होय.
पुणे विभागीय मंडळातर्फे फेब्रुवारीमध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत सोलापूर जिल्ह्याचा निकाल ९२.८३ टक्के लागला आहे. दहावीच्या परीक्षेला सोलापूर जिल्ह्यातून ६४४५४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यातील 63 हजार 849 विद्यार्थी परीक्षेला बसले होते यातील 59 हजार 277 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात 34 हजार 773 विद्यार्थी परीक्षेला नोंदणी केले होते त्यातील 34,432 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि त्यातील 31 हजार पाच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 90.4 टक्के इतके आहे. त्याचबरोबर दहावीच्या परीक्षेला 29 हजार 681 मुलींनी नोंदणी केली होती. त्यातील 29, हजार 417 मुलींनी परीक्षा दिली आणि त्यातील 28 हजार 272 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 96.10 टक्के इतके आहे.सोलापूर जिल्ह्याचा दहावीचा निकाल चांगला लागला आहे यामध्ये पुन्हा मुलीने बाजी मारल्याचे दिसून येत आहे. दहावीच्या परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी मोठी यंत्रणा लावली होती. कॉपीमुक्त अभियान यामुळे हुशार विद्यार्थ्यांना पुढे जाण्यास चांगली संधी मिळाली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी अभिनंदन केले आहे.