सोलापूरजिल्हा परिषदशिक्षण

शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी घेतली सईची “परीक्षा’

क्लास न लावता दहावीच्या परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल केले कौतुक

सोलापूर : दहावीच्या परीक्षेत क्लास न लावता 97 टक्के गुण मिळवणाऱ्या सई सारोळे हिचा माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी पुष्पगुच्छ व पुस्तक भेट देऊन सन्मान केला.

दहावीच्या परीक्षेत इंडियन मॉडेल स्कूलच्या सई सारोळे हिने यश संपादन केल्याबद्दल सर्व स्तरातून तिचे कौतुक होत आहे. बुधवारी जिल्हा परिषद पत्रकार संघ व माध्यमिक शिक्षण विभागातर्फे तिचा सन्मान करण्यात आला. माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी पुष्पगुच्छ व पुस्तक भेट देऊन सईचा सन्मान केला. यावेळी शिक्षणाधिकारी जगताप यांनी सईशी संवाद साधला. कॉपीमुक्त  अभियानाचे विद्यार्थी व पालकांमध्ये काय चर्चा होती असा सवाल केल्यावर हुशार विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा मोठा फायदा झाला आहे. विद्यार्थ्यांमध्ये अभ्यास करण्याची प्रवृत्ती  वाढीस लागली आहे, असे तिने सांगितले. दहावीचा अभ्यास कसा केला, वर्ग शिक्षकांचे मार्गदर्शन कसे राहीले  व परीक्षेनंतर सुट्टीचा वेळ कसा घालवला, भविष्यात काय होण्याची इच्छा आहे असा सवाल केल्यावर सईने शिक्षकांनी मार्गदर्शन केल्यामुळे चांगले यश मिळाले, पुस्तक वाचनासाठी वेळेचा सदुपयोग केल्याचे सांगितले. कोणती पुस्तके वाचली असा सवाल केल्यावर सई हिने ऑटोमिक हॅबिट्स, 48 लॉज ऑफ पॉवर, इन्फ्लुएन्स ही तीन पुस्तके वाचल्याचे सांगितले. ॲटोमिक हॅबिट्स हे पुस्तक मी 51 वर्षी वाचलो आहे, इतक्या कमी वयात या पुस्तकाचे वाचन केल्याबद्दल शिक्षणाधिकारी जगताप यांनी सईचे कौतुक केले व देश सेवेसाठी शिक्षणाचा उपयोग करण्याचे मार्गदर्शन केले. तिला व्हॅल्यू ऑफ एज्युकेशन हे पुस्तक भेट दिले.

याप्रसंगी जिल्हा परिषद पत्रकार संघाचे अध्यक्ष शेखर गोतसुर्वे, अमोल साळुंखे, अमोगसिद्ध मुंजे, माध्यमिक शिक्षण विभागातील लिपिक अनिल पाटील, धोत्रे, रेवे, शेख, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button