जिल्हा परिषदमहाराष्ट्रसोलापूर

काय म्हणता.. सोलापूरच्या महिला बचत गटाची केळी गेली इराणला

सोलापूर : महिलांच्या शेतकरी उत्पादक कंपनी, स्वयंसहाय्यता बचत गट यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळण्यासाठी आणि ग्रामीण महिलांचे जीवन समृद्ध होण्यासाठी उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान कार्यरत आहे. महिला बचत गटाच्यां महिलांनी एकत्रित येवुन स्थापन केलेल्या महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या वतीने शेतमालाची होत असलेली निर्यात ही निश्चित प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी केले.

उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, टेकनोसर्व आणि KD एक्सपोर्ट यांच्या संयुक्त विद्यमाने करमाळा तालुक्यातील साऊली शेतकरी महिला उत्पादक कंपनीने केळी इराण येथे निर्यात करण्यात केली आहे.

जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक संदीप कोहिनकर यांच्या मार्गदर्शनाखाली उमेद अभियान अंतर्गत स्थापन केलेल्या साऊली महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या वतीने 21 टन केळी ही इराण या देशात निर्यात करण्यात आली. यावेळी उमेदचे जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे, जिल्हा व्यवस्थापक संतोष डोंबे, टेकनोसर्व्हचे मृत्युंजय, चंद्रविर,KD एक्सपोर्टचे किरण डोके, तालुका अभियान व्यवस्थापक अवधूत देशमुख, सुषमा बिचुकले, साऊली शेतकरी उत्पादक कंपनीच्या संचालक प्राजक्ता पोरे, दिपाली पंढरे,सुवर्णा खबाले, मुक्ता सोमासे ,तबस्सुम शेख, मनिषा बोराडे उपस्थित होत्या.

यावेळी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम म्हणाले की, अभियानाच्यादृष्टीने आजचा दिवस अतिशय उल्लेखनीय असून उमेद अभियानाच्या अंतर्गत कार्यरत महिलांच्या शेतमालाला योग्य मोबदला मिळावा यासाठी सातत्याने प्रयत्न होत आहेत.

  केळीला इराणला मोठी मागणी

साऊली शेतकरी महिला कंपनीच्या मनीषा बोराडे म्हणाल्या की, केळी उत्पादन स्थानिक बाजारपेठेपेक्षा जास्त दराने निर्यात होत असल्यामुळे सर्व महिलांना आनंद होत आहे. त्यामुळे भविष्यात कंपनीच्या माध्यमातून जास्तीत जास्त शेतमाल निर्यात करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी उमेद अभियान मधील सर्व अधिकारी यांचे मार्गदर्शन मिळत असल्याने हे शक्य होत असल्याचे बोराडे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button