अमोल जाधव बेस्ट ऑफिसर तर संजय धनशेट्टी बेस्ट इंजिनिअर पुरस्काराने सन्मानित

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या जलजीवन मिशनचे संचालक अमोल जाधव बेस्ट अधिकारी तर ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी यांना बेस्ट इंजिनिअर पुरस्काराने राज्याचे क्रीडामंत्री दत्ता भरणे यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले आहे.
नवभारत वृत्तपत्र समूहाच्या नवराष्ट्र बेस्ट एक्झिक्यूटिव्ह इंजिनियर पुरस्काराने जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर संजय धनशेट्टी यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. क्रीडा व युवक मंत्री दत्ता मामा भरणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला. पुणे येथील तारवाडे क्लार्क वन येथील हॉटेलमध्ये शनिवारी हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यकारणी अभियंता संजय धनशेट्टी यांचे सोलापूरच्या शहर आणि ग्रामीणमध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी मोठे योगदान राहिले आहे. दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जाणारा सोलापूर शहरात पिण्याच्या पाणी समस्या सोडवण्यात त्यांना यश प्राप्त झाले आहे . कार्यकुशल पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता अशी ओळख धनशेट्टी यांनी निर्माण केली आहे. त्यांना राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील अनेक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.२०१२ _ २०१३ साली हि टंचाई मध्ये चांगले काम केल्याबद्दल तत्कालीन जिल्हाधिकारी गेडाम व तत्कालीन केंद्रीय गृृृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते गौरवण्यात आले होते. २०१२ साली जिल्ह परिषदमध्ये आदर्श उपभियांता म्हणून त्यांचा गौरव झाला होता.
जल जीवन मिशनचे संचालक अमोल जाधव यांनी नुकत्याच झालेल्या
आषाढीवारीत भरीव कामगिरी केली आहे. महाराष्ट्र राज्यातून येणाऱ्या विविध वारकरी दिंड्यांच्या पाणीपुरवठा टँकरचे हजारो स्वच्छतागृहाचे व मागणीनुसार उत्कृष्ठ नियोजन केले आहे . यासह २०१८ साली प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेचा विभागस्तरीय राज्यपाल यांच्याहस्ते पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला आहे.माझी वसुंधरा योजनेत राज्यस्तरीय दुसरा पुरस्कार असे विविध पुरस्काराने अमोल जाधव यांना गौरविण्यात आले आहे. अमोल जाधव व संजय धनशेट्टी यांच्या कार्याची दखल घेत नवराष्ट्र वृत्तपत्र समूहाने त्यांचा गौरव केला आहे. या पुरस्काराने जिल्हा परिषदेचा मान वाढल्याबद्दल विविध स्तरातून दोघांचे अभिनंदन होत आहे.



