सोलापूरक्राईम

सोलापुरात पुलाच्या उतारावर स्कूलबसचे ब्रेकफेल

सोलापूर : सोलापुरात पुलाच्या उतारावर स्कूलबसचे ब्रेक फेल झाल्याने बस उतारावर मागे घसरत जात असताना रिक्षा चालकांच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला आहे.

झाले असे मंगळवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास निराळेवस्ती येथील पुलावरून स्कुल बस विद्यार्थ्यांना घेऊन शाळेकडे निघाली होती. पुलावर आल्यावर समोरून वाहन आल्याने चालकाने ब्रेक लावला पण ब्रेक फेल झाल्यामुळे पाठीमागे जाऊन स्कॉर्पिओ गाडीला धडकली आणि स्कॉर्पिओ मागील एका टू व्हीलरवर आदळली. सुदैवाने गाडीवरील व्यक्ती थोडक्यात बचावली, तेथील रिक्षाचालक यांनी स्कुल बसच्या चाकाला मोठाले दगड लावून अनियंत्रित झालेली बस थांबवली, बसमध्ये विद्यार्थी होते. तिथून जाणारे मराठा समाजाचे नेते दास शेळके यांनी चालकाकडून अधिक माहिती घेतली असता बसचे ब्रेक फेल झाले होते पण तेथील रिक्षा चालकांच्या सतर्कतेमुळे होणारा अनर्थ टळला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button