सोलापूर : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापती संस्कृती सातपुते यांनी बी. सी. गर्ल्स हॉस्टेल (मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह) आणि बालगृहाला भेट देऊन तेथील व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी केली.
या भेटीदरम्यान वसतिगृहातील व बालगृहातील मुलींशी आणि लहान मुलांना मिळणारे भोजन, निवास व्यवस्था, पिण्याचे पाणी, स्वच्छता आणि सुरक्षेच्या उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेतला. विद्यार्थिनींना व लहान मुलांना येथे उत्तम आणि सुरक्षित वातावरण मिळावे या दृष्टीने प्रशासकीय यंत्रणेला आवश्यक त्या सुधारणा करण्याबाबत महत्त्वपूर्ण सूचना केल्या.
जिल्हा परिषद वाचनालय पाहणी
सोलापूर जिल्हा परिषद येथील वाचनालयास सदिच्छा भेट देऊन तेथील व्यवस्थेचा व पुस्तकांच्या उपलब्धतेचा सभापती सातपुते यांनी सविस्तर आढावा घेतला. सर्व वाचकांसाठी हे वाचनालय अधिक सुसज्ज आणि अद्ययावत व्हावे, यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.या भेटीदरम्यान वाचनालयाच्या नूतनीकरणाच्या कामाबाबत समाजकल्याण विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांना आवश्यक त्या सुधारणा व महत्त्वपूर्ण सूचना केल्या. जिल्हा परिषदेचे हे वाचनालय येणाऱ्या काळात सर्व सोयी-सुविधांनी युक्त होऊन वाचकांसाठी अधिक समृद्ध ठरेल, असा मला पूर्ण विश्वास आहे, असे सभापती सातपुते म्हणाल्या. सभापती सातपुते यांनी समाजकल्याण विभागाच्या विविध योजनांचा सामान्यांना लाभ देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

More Stories
पांडुरंगाच्या पावन नगरीत आषाढीच्या सुविधेबाबत झेडपीची पहिल्यांदा झाली सभा
सोलापूरच्या महिला बचत गटाचा 30 टन कांदा गेला श्रीलंकेला
बार कौन्सिल निवडणुकीत ॲड. मिलिंद थोबडे यांची विजयी हॅट्रिक