सोलापूरमहाराष्ट्र

हिंदवी परिवाराच्या ३०० शिवभक्तांनी पूर्ण केली दक्षिण दिग्विजय मोहीम!

राजा माने, राजीव खांडेकर, डॉ.रामदास आवाड, नितीन खिलारेंना सह्याद्री भूषण पुरस्कार

सोलापूर: हिंदवी परिवार या संस्थेच्या ३०० शिवभक्तांनी तामिळनाडूतील चेन्नई येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिंजी किल्यावर जावून दक्षिण दिग्विजय मोहीम यशस्वी केली. हिंदवी परिवाराचे संस्थापक शिवचरित्र व्याख्याते डॉ.शिवरत्न शेटे यांच्या नेतृत्वाखाली जिंजी किल्ल्याच्या पायथ्याशी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील दहा मान्यवरांना सह्याद्री भूषण हा पुरस्कार पद्मश्री पोपट पवार यांच्याहस्ते देवून गौरविण्यात आले.त्यात नवशक्ति व फ्री प्रेस जर्नलचे समूह राजकीय संपादक राजा माने, एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर आयुर्वेदाचार्य डॉ.रामदास आवाड, चित्रकार नितीन खिलारे आदींचा समावेश आहे.

राष्ट्र प्रथम वंदे मातरम ह्या ब्रीद वाक्याने चालणारी हिंदवी परिवार ही संघटना, युवकांनी छत्रपती शिवरायांच्या फक्त भोगोलिक नव्हे तर छत्रपती शिवरायांच्या आचरणाचा मार्गावर चाललं पाहिजे ह्यासाठीच गेली दोन दशकांपासून दरवर्षी गडकोट पदभ्रमंती मोहिमांचे आयोजन हिंदवी परिवार करत असते. यंदाच्या वर्षी देखील दिनांक 9 डिसेंबर ते 13 डिसेंबर ह्या 4 दिवसात छत्रपती शिवरायांची दक्षिण दिग्विजय मोहिमेचा थरार महाराष्ट्रातील शिवभक्तांना अनुभवता यावा ह्यासाठी हिंदवी परिवाराचे संस्थापक अध्यक्ष तथा शिव व्याख्याते डॉ शिवरत्न शेटे यांच्या नेतृत्वाखाली तामिळनाडू येथील स्वराज्याची तिसरी राजधानी जिंजी किल्ला तसेच साजीरा-गोजीरा किल्ला, वेल्लोर किल्ला, बृहदेश्वर मंदिर तंजावर पॅलेस,सरस्वती महाल आदी ठिकाणी पदभ्रमंती मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण पदभ्रमंती मोहिमेचे नियोजन मोहीम सरनौबत डॉ संभाजी भोसले आणि कार्याध्यक्ष अमोल मोहिते यांनी पाडले.

मोहिमेच्या पहिल्या दिवशी गोजीरा किल्ला व वेल्लोर भुईकोट किल्ला पाहिला तर वेल्लोर किल्ला जिंकण्यासाठी शिवछत्रपतींनी समोरील डोंगरावर बांधलेले जुळे किल्ले साजिरा-गोजिरा ,यापैकी साजिऱ्यावर उपलब्ध असलेल्या दुर्मिळ शिवछत्रपतींच्या दगडीस्तंभावरील शिल्पाला मोहिमवीरांनी जंगली वेलींच्या दाट जाळ्यातून मुक्त करून सर्वांना दर्शन घडविले ,हे मोहिमेचे वैशिष्ट्ये ठरले . दुसऱ्या दिवशी साजिरा किल्ला सर केला महाराष्ट्रातील विविध सांस्कृतिक कार्यक्रम तेथील तामिळ मराठी बांधवांच्या उपस्थिती मोहिमेसाठी आलेल्या शिवभक्तांकडून सादर करण्यात आले. तिसऱ्या दिवशी सर्व शिवभक्तांनी जिंजी येथील कृष्णगिरी आणि राजगिरी किल्ला सर केला. याप्रसंगी हिंदवी परिवाराचे संस्थापक अध्यक्ष डॉ शिवरत्न शेटे यांनी आपल्या व्याख्यानातून जिंजी किल्याचे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज यांच्या काळात केल्या गेलेल्या दक्षिण दिग्विजय मोहिमेचा इतिहास उपस्थितांना  सांगितला. मोहिमेच्या शेवटचा म्हणजे चौथ्या दिवशी तंजवार येथील बृहदेश्वर मंदिर, मराठा पॅलेस, सरस्वती महल, आदी ठिकाण तंजावर गादीचे छत्रपती व्यंकोजीराजे यांचे 14 वे वंशज आबाजी राजे भोसले यांच्या उपस्थितीत तंजावरच्या मराठा दरबारातही तंजावरचे सरफोजीराजे भोसले यांच्या इतिहासाचे संक्षिप्त कथन डॉ.शेटे यांनी केले.

या मोहिमेत तंजावर गादीचे छत्रपती व्यंकोजीराजे यांचे 14 वे वंशज आबाजी राजे भोसले व राणीसाहेबांचा विशेष मानपत्र देऊन जिंजी पायथ्याला गौरव करण्यात आला. या पदभ्रमंती मोहीमेत भूषण बापट, हितेश डफ, दिलीप मेसरे, विठ्ठल इंगळे, संतोष शेटे, धारेश्वर तोडकरी, नितीन सुकरे,डॉ. स्वरूप पाटील वसंत झावरे, शंभू लेंगरे, अर्चना शिंदे, महेश शिंदे, डॉ अभिषेक गांधी, संभाजी जाधव, गौतम गांधी, लता धामणे, अमृत काटकर, पद्मिनी गावंडे यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button