
सोलापूर : जिल्हा कारागृहात कार्यरत असलेल्या पोलीस शिपायाने वरिष्ठांवर सोशल मीडियावर आरोप करीत स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. यात जखमी झालेल्या त्या पोलीस शिपायाला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
विकास गंगाराम कोळपे (वय 34 रा. जेलरोड पोलीस वसाहत सोलापूर) असे स्वतःवर गोळी झाडून घेतलेल्या कारागृह पोलीस शिपायचे नाव आहे. शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मेनगार्ड येथे ड्युटीवर असताना कारागृह शिपाई विकास कोळपे यांनी आपल्याजवळील एसएलआर रायफलने छातीवर गोळी मारून घेतली. यामध्ये गोळी लागून गंभीर जखमी झाल्याने त्यांना जखमी अवस्थेत उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात करण्यात आले आहे. हे कृत्य करण्यापूर्वी विकास कोळपे यांनी फेसबुकवर वरिष्ठांना कंटाळून आत्महत्या करत असल्याची एक पोस्ट ठेवल्यामुळे खळबळ उडाली आहे. गेल्या महिन्यात एका फौजदाराने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती त्यानंतर हा प्रकार घडल्यामुळे सोलापुरात चर्चेचा विषय झाला आहे. ठेवली होती.

Tags
#solapur police