सोलापूरनिवडणूकराजकीय

रेवणसिद्ध पट्टदेवरु महास्वामी यांनी दिला देवेंद्र कोठे यांना आशीर्वाद

सोलापूर : शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं (ए) गट महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांच्या प्रचारार्थ बुधवारी सुनिल नगर परिसरात मैंदर्गी येथील गुरु हिरेमठ मठाचे मठाधिपती अभिनव रेवणसिद्ध पट्टदेवरु महास्वामीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेस महिलांसह नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला. यावेळी महास्वामीनी कोठे यांना यशस्वी होण्याचा आशीर्वाद दिला.

सुनीलनगर येथून सुरुवात झालेली ही पदयात्रा माने दवाखाना, नराल मंगल कार्यालय, कलावती मंदिर, अविनाश नगर, शिवशक्ती चौक, महात्मा बसवेश्वर चौक, शिवलिंग नगर भाग पाच, सिध्दारूढ मठ, विनायक नगर, वसुंधरा नगर, सिद्धेश्वर नगर, मल्लिकार्जुन नगर, कोटा नगरपर्यंत काढण्यात आली.उमेदवार देवेंद्र कोठे म्हणाले, सुनील नगर आणि परिसरातील नागरिकांचा प्रचंड मोठा प्रतिसाद पदयात्रा, प्रचार फेरी, होम टू होम प्रचार अभियानाला मिळत आहे. त्यामुळे शहर मध्य विधानसभा मतदारसंघात भाजपा आणि महायुतीचा विजय निश्चित आहे. माजी नगरसेवक विनायक कोंड्याल म्हणाले, सुनील नगर आणि परिसरातील नागरिकांचा भाजप आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांना निवडून देण्याचा निश्चय झाला आहे. या परिसरातून मोठे मताधिक्य आम्ही देणार आहोत.या पदयात्रेत भाजपाचे शेले, टोप्या परिधान करून यावेळी शेकडो कामगार बांधव, सुनीलनगर आणि परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. याप्रसंगी माजी सभागृह नेते शिवानंद पाटील, भाजपा शहर सरचिटणीस रोहिणी तडवळकर, माजी नगरसेवक विनायक कोंड्याल, माजी नगरसेवक मेघनाथ येमूल, माजी नगरसेवक डॉ. राजेश अनगिरे, काशिनाथ झाडबुके, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, महिला मोर्चाच्या शहर अध्यक्षा विजया वड्डेपल्ली, ओबीसी महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस इंदिरा कुडक्याल, भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा रंजीता चाकोते, प्रदेश चिटणीस अर्चना वडनाल, प्रदेश कार्यकारणी सदस्य शोभा नष्टे, माजी नगरसेविका राधिका पोसा, विजयलक्ष्मी गड्डम, माजी नगरसेविका राधिका पोसा, शहर चिटणीस सुनील गौडगाव, विधानसभा पदयात्रा प्रमुख दत्तात्रय पोसा, मंडल अध्यक्ष गिरीश बत्तुल, ओबीसी मोर्चाचे मंडल अध्यक्ष भीमाशंकर बिराजदार, सिद्धाराम खजुरगी, मंडल उपाध्यक्ष भीमाशंकर जावळे, सुनिता कामाठी, आशा नगर येथील मठाचे ट्रस्टी अध्यक्ष सिद्धाराम निंबाळे, सचिव गुरुनाथ प्याटी, चंद्रकांत फुलारी, सोशल मीडिया शहर संयोजक अभिषेक चिंता, शहर मध्य विधानसभा सोशल मीडिया संयोजक अंबादास सकिनाल, विधानसभा सहसंयोजक भास्कर बोगम, डॉ. राजेंद्रप्रसाद गाजुल, सोशल मीडिया मध्य विधानसभा महिला प्रमुख अंजली वलसा, शहर चिटणीस सावित्री पल्लाटी, चिटणीस संगीता खंदारे, मोनिका कोठे, जैन प्रकोष्ठ प्रमुख साधना संगवे, महिला मंडल अध्यक्षा लक्ष्मी बदलापुरे, राधिका चिलका, धनश्री कोंड्याल, अर्चना बोमड्याल आदी सहभागी झाले होते.

पुष्पवृष्टी करून महास्वामीजींचे स्वागत

गुरु हिरेमठ मठाचे मठाधिपती अभिनव रेवणसिद्ध पट्टदेवरु महास्वामीजी यांचे नागरिकांनी ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून स्वागत केले. विकासाची तळमळ असलेले आणि राष्ट्रभक्तीचा बुलंद आवाज असलेले देवेंद्र कोठे यांच्या पाठीशीच उभे राहण्याचे अभिवचन यावेळी नागरिकांनी महास्वामीजींना दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button