सामाजिकसोलापूर

‘लढा सोलापूरच्या विकासाचा” उपक्रमासाठी पुढाकार

मार्ग फाउंडेशन घेणार महत्वाची भूमिका

सोलापूर : मार्ग फाऊंडेशन सोलापूरच्यावतीने  ‘लढा सोलापूर विकासाचा “ या अभियानाद्वारे शहर व जिल्ह्याची सद्य स्थिती ,वास्तव-व्यथा, दशा व दिशा तसेच सामाजिक,राजकीय यांसारख्या निगडित अनेक महत्वाच्या विषयांवर प्रकाश टाकणार असल्याची माहिती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

देशाच्या स्वातंत्र्यसाठी सोलापूरच्या चार हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. देशाचा अमृतमहोउत्सव उलटून गेला तरी अजूनही सोलापूर नगरीतील लोकांना हाल सोसावे लागत आहेत.एकेकाळी गिरणगांव म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या सोलापूरातून सोन्याचा धूर निघत होता महाराष्ट्र राज्यात सोलापूरचा सर्वच क्षेत्रात दबदबा होता. कालांतराने अनेक मिल,कारखाने बंद झाले. यामुळे रोजी-रोटीसाठी अनेकांनी सोलापूरातून स्थलांतर केले व ते आजही मोठ्या प्रमाणावर सुरु आहे, बुलेट ट्रेनच्या वेगासारखी सोलापूरची अधोगती होत आहे आणि हे सर्व आपण सर्वजण उघड्पणे पाहत आहोत, ही आपल्या सर्वांची शोकांतिका आहे.आम्ही मार्ग फाऊंडेशनचा माध्यमातून तसेच शहरातील अन्य सामाजिक संघटना,विविध मंडळे व सोलापूरच्या नागरिक यांच्या बरोबरीने “ लढा सोलापूर विकासाचा “ या मोहिमेअंतर्गत सोलापूरच्या विविध सामाजिक-राजकीय प्रश्ने,रखडलेली विकासकामे,स्मार्ट सिटीची अर्धवट कामे,परिवहन व्यवस्था,विमानसेवा,हद्दवाढ भागाच्या विकासाकडे दुर्लक्ष,औदयोगिक वसाहतीकडे झालेले दुर्लक्ष, मंजूर झालेले मोठे प्रकल्प दुसऱ्या जिल्ह्यात नेण्याचे प्रकार, हक्काच्या उजनी धरणाच्या पाण्याची चोरी, बोकाळलेला भ्रष्टाचार,वाढती बेरोजगारी,गुन्हेगारी,अवैध धंदे यांसारख्या सोलापूरच्या विकासाला बाधा आणणाऱ्या सर्व गोष्टींबाबत सोलापूरच्या नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करून सोलापूर शहराच्या भविष्याबाबत सजगकपणे विचार करायला लावणार आहोत असे यावेळी पवार यांनी सांगितले.

पारंपरिक वस्त्रोउद्योग,विडी उद्योग याला घरघर लागत आहे या उद्योगांच्या प्रश्नांचा पाठपुरवठा व्यवस्थित केला जर नाही अजूनही या उद्योगांना कोणत्याही प्रकारची सबसिडी वा सवलती का मिळाल्या नाहीत? मोठे उद्योगधंदे नसल्यामुळे वाढती बेरोजगारी संख्या वाढत असल्यामुळे शहरातून स्थलांतराचे प्रमाण वाढत आहे यासाठी आज पर्यंत काय उपाययोजना झाल्या? हद्दवाढ भाग महानगर पालिकेमध्ये समाविष्ठ होऊन २८ वर्षे उलटून गेली तरीही मूलभूत सुविधां अजूनही प्रलंबित का आहेत? सोलापूरच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा असलेल्या परिवहन उपक्रमाच्या दुर्दशेला कोण जबाबदार आहेत? याला उर्जितावस्थेत आणण्यासाठी व जेनयू अंतर्गत १५० बसेस च्या चेसी क्रॅक प्रकरणाचे काय झाले ?सोलापूरला मंजूर झालेल्या अन्न उत्कृष्टता केंद्र (मिलेट ) बारामतीला स्थलांतर झाले का नाही याबात अजुनही साशंकता तशीच आहे? ज्या नगरीला वस्रोउदयोगाचा कोणताही गंध नाही त्या उस्मानाबाद जिल्ह्यात सोलापूरकरांच्या नाकावर टिचून तेथील लोकप्रतिनिधींनी मंजूर करून घेतला मग आपल्या येथील लोकप्रतिनिधी काय करत होते? विमानसेवेच्याबाबतीत काय राजकारण चालू आहे. याचा काही थांगपत्ता सोलापूरकरांना लागेनाच. लोकप्रतिनिधी या प्रश्नावर आपल्या सोयीची भूमिका घेऊन याचा विपर्यास का करतात? यांसारखे असंख्य प्रश्नांवर स्थानिक लोकप्रतिनिधींनी फक्त बोलण्याशिवाय काही कृती केली का नाही? हा संशोधनाचा विषय आहे असं आम्हाला वाटतं.सोलापूरच्या उज्वल भविष्यासाठी आम्ही सर्वांची मोट बांधून एक सर्व सोलापूकरांच्या साथीने “ लढा सोलापूर विकासाचा “ हा मोठा व्यापक लढा करणार आहोत. यासाठी संपूर्ण शहरात सोलापूरच्या प्रलंबित प्रश्नांवर सायकल रॅली,सह्यांची मोहीम,कॉर्नर बैठक अश्या प्रकारच्या विविध माध्यमातून जनजागृती करून विविध प्रकारची लक्षवेधी आंदोलने करून सोलापूरची विदारक परिस्थिती करणाऱ्यांच्या निदर्शनास आणून देऊन सोलापूच्या लोकप्रतिनिधींना याचा जाब विचारणार आहोत..या व्यापक लढ्यात सहभागी होऊन सोलापूरचे सुवर्णक्षण पुन्हा आणण्यासाठी आम्हाला साथ देतील असा आम्हाला विश्वास वाटतो अशी अपेक्षा मार्ग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष पवार यांनी व्यक्त केली.

या पत्रकार परिषदेस मार्ग फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक संतोष राठोड,अमर कांबळे,श्रद्धा गायकवाड,बाबासाहेब माने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button