आता दुकानदारांसाठी पोस्टाची क्यूआर कोड सेवा
खात्यावर शिल्लक व कोणतेही चार्जेस नसल्याने व्यापाऱ्यांना होणार फायदा

सोलापूर : सोलापूर डाक विभागात इंडिया पोस्ट पेमेंट बँकेअंतर्गत व्यापारी वर्गासाठी उपयोगी IPPB मर्चंट अकौंट उघडून QR कोड
सोलापूर डाक विभागाचे प्रवर अधीक्षक नरेंद्र बाबू यांच्या नेतृत्वाखाली अक्कलकोट शहरात वितरित करण्यात आले. अशा तऱ्हेने IPPB मर्चंट अकौंट उघडून QR कोड वितरण करण्याचा पायलट ड्राइव्ह सोलापूर जिल्ह्यात सुरू करण्यात आला आहे. सोलापूर टपाल विभागाने खास “सोलापूर समाचार’ साठी ही बातमी दिली आहे.
प्रवर अधीक्षक नरेंद्र बाबू यांनी वैयक्तिकरित्या अक्कलकोटमधील विविध दुकानदारांसोबत प्रत्यक्ष भेटून IPPB मर्चंट अकौंट बद्दल माहिती दिली व मर्चंट खाती उघडून दुकानदारांना QR कोड वितरीत केले.
IPPB मर्चंट अकौंट ची काही वैशिष्टे खालील प्रमाणे.
खात्यात रक्कम ठेवण्याची कोणतीही अट नाही.
कोणतेही चार्जेस आकारले जाणार नाहीत.
QR स्टीकरसाठी कोणतेही चार्गेस नाही.
QR कोड मार्फत पाठवलेले पैसे लगेच खात्यात जमा होतात.
यावेळी अनिल साळुंखे, सहाय्यक अधीक्षक, सोलापूर दक्षिण उपविभाग आणि विनायक पासंगराव, IPPB मॅनेजर, सोलापूर विभाग व पोस्टमन स्टाफ अक्कलकोट पोस्ट ऑफिस, यांनी दुकानांमध्ये जाऊन व्यापाऱ्यांची पेमेंट सिस्टमशी संबंधित अडचणी समजून घेतल्या. पोस्टमनना व्यापाऱ्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी सूचना दिल्या.अक्कलकोट शहरात ८ व्यापारी खाते उघडण्यात आली. तसेच नरेंदर बाबू यांनी नोव्हेंबर २०२४ महिन्याला “मर्चंट ऑनबोर्डिंग महिना” म्हणून घोषित केले आहे.
या मोहिमेचा उद्देश सोलापूर जिल्ह्यातील व्यापारी वर्ग / छोटे-मोठे दुकानदारसाठी DakPay मार्फत डिजिटल पेमेंट सिस्टमच्या वापरास प्रोत्साहन देणे आहे. यामुळे व्यापाऱ्यांना आर्थिक व्यवहार सुलभ होणार आहेत तसेच त्यांचा व्यवसाय देखील डिजिटल पद्धतीने वाढवता येईल.