वचनपूर्तीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत सोलापूरला
'जिसका हम शीलान्यास कर रहे है, उसकी चाबी देणे हम ही आयेंगे" असे म्हणाले होते मोदी

राजकुमार सारोळे
सोलापूर : ‘जिसका हम शीलान्यास करते है, उसका उद्घाटन भी हम ही करते है. सोलापूर मे जो 30 हजार घरं का शिलान्यास हमने आज किया है, उसकी चाबी देने के लिए हम ही आयेंगे”, असे वचन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 जानेवारी 2019 रोजी सोलापूरकरांना दिले होते. त्या वचनपूर्तीसाठी पंतप्रधान मोदी पुन्हा 19 जानेवारी रोजी चौथ्यांदा सोलापूर दौऱ्यावर येत आहेत.
माकपचे माजी आमदार नरसया आडम यांच्या रेनगर या 30 हजार घरकुलांच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 9 जानेवारी 2019 रोजी सोलापूर दौरा झाला होता. पार्क स्टेडियमवर हा कार्यक्रम झाला होता. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापूरला मी तीन वेळा येऊन गेलो. मागच्या दौऱ्यामध्ये सोलापूरकरांच्या ‘बी एस पी” अशा तीन महत्त्वपूर्ण समस्या आढळून आल्या होत्या. बी म्हणजे बिजली, एस म्हणजे सडक, आणि पी म्हणजे पाणी. या तिन्ही समस्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजनेतून सोलापूर जिल्ह्यात रस्त्यांचे मोठे जाळे विणले जात आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय महामार्गाचीही मोठी कामे सुरू झाली आहेत. स्मार्ट सिटीमधून सोलापूर शहरासाठी मोठी कामे होत आहेत. त्यामुळे भविष्यकाळात सोलापूर सुजलाम सुफलाम होईलच. ग्रामीण भागातील लोकांची विजेची समस्या सोडवण्यासाठी सौभाग्य योजना राबविण्यात येत आहे. मोठ्या गतीने या योजनेचे काम होत असल्याने अनेकांच्या घरात प्रकाश येणार आहे. त्याचबरोबर यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी सोलापूर उस्मानाबाद रेल्वेची मोठी घोषणा केली होती. हे कामही आता मार्गावर येत आहे. रे नगरच्या घरकुलाचे पूजन करताना पंतप्रधान मोदी म्हणाले होते, ‘ज्या कामाचे आम्ही भूमिपूजन करतो, त्या कामाचे उद्घाटनही आम्हीच करतो. इतर राजकीय मंडळी सारखं आमचं काम नाही. रे नगरच्या तीस हजार घरकुलाचे आज मी भूमिपूजन केले आहे, या घरकुलातील घरकुलाची लोकांना चावी देण्यासाठीही मीच येणार आहे, असे वचन त्यांनी दिले होते. दिलेल्या वचनाप्रमाणे रे नगरमधील घरकुलाच्या लाभार्थ्याला चावी देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारी रोजी सोलापूरला येत आहेत. या वचननाम्याची पूर्ती व नवीन कोणत्या योजनांची घोषणा पंतप्रधान मोदी करणार? याकडे सर्वांच्या आता लक्ष लागले आहे.
या घडल्या होत्या घटना
पंतप्रधान नरेंद्र मोदी तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच्या व्यासपीठावर माकपचे माजी आमदार नरसया आडम यांनी बांधकाम, अल्पसंख्यांक, विडी कामगार साठी स्थापन केलेल्या रे नगर घरकुलच्या मंजुरीसाठी आलेल्या अडचणीचा पाढा वाचला होता. मोदी यांच्या दौऱ्यानंतर चार पुतळ्याजवळ माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व आडममास्तर यांची भेट झाली होती. त्यावेळी आडम यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासमोर केलेल्या भाषणाचा धागा पकडून शिंदे यांनी त्यांना रे नगरच्या फाईलची आठवण करून दिली होती. हा किस्सा बराच गाजला होता. त्यानंतर मोदी यांच्या व्यासपीठावर हजेरी लावून त्यांची स्तुती केल्यामुळे माकपने मार्च 2019 मध्ये आडम यांना पक्षातून निलंबित केले होते. पण कामगारांच्या घरकुलाच्या स्वप्नपूर्तीसाठी आडम या कारवाईला सामोरे गेले.
पंतप्रधान मोदी यांच्या मागील दौऱ्याच्या भाषणाची पहा ही क्लिप…
I have come to Solapur to seek blessings: PM Modi https://www.indiatoday.in/india/video/i-have-come-to-solapur-to-seek-blessings-pm-modi-1426939-2019-01-09