फुकटच्या योजना बंद करा, ठेकेदाराची बिले अदा करा
ठेकेदार झाले आक्रमक ; काम करूनही आठ महिन्यापासून बिल अदा नाही

सोलापूर : महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील सर्व विभागाकडील कंत्राटदार यांचे देयके गेल्या आठ महिन्यापासून दिली जात नाहीत.तसेच कंत्राटदार यांच्या महत्त्वाचे मागण्यांबाबत कायम दुर्लक्ष केले जात आहे. या सर्व गंभीर गोष्टीचा निषेध व्यक्त करण्यासाठी सोलापुरात जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद कार्यालयसमोर पुनम गेट येथे महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, राज्य अभियंता संघटना, सोलापुर जिल्हा लेबर फेडेरेशन , सोलापूर महापालिका कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन द्वारे धरणे आंदोलन मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या कंत्राटदार संख्येने यशस्वीपणे पार पडले.
या आंदोलनात विविध संघटनेचे सदस्य व पदाधिकारी यांच्यावतीने शासकीय फुकट वाटप धोरणांचा निषेध केला, तसेच राज्यातील विकासांची कामे केलेल्या कंत्राटदार जाणीवपूर्वक देयके न देणे व त्यांच्या इतर मागण्यांबाबत शासनाकडून कायम दुर्लक्ष करणे, या बाबींचा समाचार सदर आंदोलनात घेण्यात आला. बजेटमध्ये आर्थिक नियोजन शुन्य कारभार, तसेच मार्चमध्ये कंत्राटदार यांची शासनाकडून देयके न मिळाल्यास सदर वित्तीय संस्थाचे कंत्राटदारावर भलेमोठे ओढावणारे आर्थिक संकट यामुळे कंत्राटदार व त्यांचे कुटुंब व त्यावर अवलंबून असणारे लाखो घटकांचे संसार उद्ध्वस्त होणार तर आहेतच तसेच कंत्राटदार यांचा आर्थिक दृष्ट्या महत्त्वाचे घटक असलेला सिबिल हा घटक प्रचंड खालच्या स्तरावर येणार आहे, तसेच राज्याची पुढील काळात गंभीर होणारी आर्थिक परिस्थिती यामुळे ठेकेदार व्यवसाय अडचणीत येणार आहे, अशी भिती महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटनेचे राज्य अध्यक्ष इंजि मिलिंद भोसले यांनी व्यक्त केली आहे
या आदोलनास बहुसंख्येने उपस्थित असलेल्या कंत्राटदार मंडळींनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता संजय माळी यांची भेट घेऊन चर्चा केली व निवेदन दिले. तसेच सोलापूर जिल्हाचे निवासी जिल्हाधिकारी मनीषा कुभांर यांना भेटुन निवेदन दिले. या आंदोलनमध्ये महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे व राज्य अभियंता संघटनेचे राज्य अध्यक्ष इंजि मिलिंद भोसले, बिल्डर्स असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष संतोष कलगुटगी, माजी राज्य अध्यक्ष दत्तात्रेय मुळे, सोलापूर जिल्हा लेबर फेडेरेशन चे सचिव चंद्रकांत आवताडे,सोलापूर महापालिका कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष रामभाऊ दुधाळ, इलेट्रीक कंत्राटदार संघटनेचे उपाध्यक्ष बसवराज कल्याणी, कांतीलाल डुबल, सिद्देश्वर काळे, शिवानंद पाटील, त्रज्ञषी वानकर,कैलास लांडे, नरेंद्र भोसले, अभिराज शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस युवा जिल्हा अध्यक्ष सुहास कदम, सचिव बाळासाहेब मोरे, अजय अन्नलदास, हणमंत कुलकर्णी, युवराज चुंबळकर,महेश जाधव, विनोद क्षीरसागर, सोमनाथ दावणे,संतोष लांबगुडे, शरणप्पा शिरूर, गोविंद अनागुंडे, सादिक शेख, विशाल जोग, राजाभाऊ कलकेरी,सचिन गुंड,महादेव घोडके, शेखर शिवशरण, प्रमोद कुलाल, अमोल गौर, मनोहर शिराळ, सतीश जंगाले,राजेश सुरवसे, सचिन जाधव, मारूती पवार, युवराज मुटकुळे, विलास बेडगे,राजकुमार खुर्द, श्रीनिवास इंगवले, गणपत मस्के, दीपक मोहिते, केशव घोगरे, महेश माने, हेमंत पाटोले, बाळासाहेब मोटे, श्रीकर बरबडे,संजय डांगे, श्रीकर बरबडे, दिनेश झांबरे, सुधीर लांडे, सागर पवार, श्रीकांत बिराजदार, नित्यानंद शिंदे, बालाजी विठलकर,संजय देशपांडे, हणमंतु तरंगे, विलासराव पाटील, सुनील दुधगंडी, महेश बेदरे,अभिजीत पांगळे, प्रमोद भंडारे, उमेश सोनी, मनोज मेहता, मुकेश हजारीवाले,अक्षय हणमे,अंजिक्य उंबरजे,सिद्धाराम ढंगापुरे, दत्तात्रेय जाधव, आंनद वंजारे,सुजित पाटोळे, अमर चौगुले, विवेक भोसले, बाळासो मोरे, भारत कोरडे सह असंख्य सुशिक्षित बेरोजगार अभियंता, कंत्राटदार, मजुर संस्था सदर आंदोलनात बहुसंख्येने प्रतिनिधी उपस्थित होते