सोलापूरनिवडणूकराजकीय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला 50 हजार जणांची बैठक व्यवस्था

आमदार विजयकुमार देशमुख देणार सोलापूरच्या विकासाची माहिती

सोलापूर : महायुतीच्या आज होणाऱ्या महाविजय सभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांची सोलापुरातील होम मैदानात जाहीर सभा होणार असून 50 हजार कार्यकर्त्यांची बैठक व्यवस्था करण्यात आल्याची माहिती भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या होणाऱ्या सभेच्या व्यवस्थेची खासदार धनंजय महाडिक, शहराध्यक्ष नरेंद्र काळे,विक्रम देशमुख यांनी सोमवारी सायंकाळी  सभास्थळाची पाहणी केली यावेळी खासदार धनंजय महाडिक यांनी मंगळवारी होणाऱ्या पंतप्रधानाच्या या सभेला पन्नास ते साठ हजार लोकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली असून पंतप्रधानासमवेत केंद्रातील बडे नेते मंडळी येणार असल्याची माहिती दिली.पंतप्रधान नरेंद्र् मोदी यांचे विचार ऐकण्यासाठी जिल्ह्यातुन महायुतीचे कार्यकर्ते,पदाधिकारी असंख्य जनसमुदाय येणार असल्याने चोख व्यवस्था करण्यात आल्याची माहिती शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी दिली. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आमदार विजयकुमार देशमुख सोलापूरच्या विकासाची माहिती देणार आहेत.

विजयकुमार यांची भव्य पदयात्रा 

प्रभाग क्रमांक ९ येथे महायुतीचे उमेदवार आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ सोमवारी सायंकाळी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ही पदयात्रा रविवार पेठ भद्रावती पेठ जोड बसवण्णा चौक वडार गल्ली विनोबा भावे झोपडपट्टी आदी परिसरात मोठ्या जोशात निघाली. फटाक्यांची आतिशबाजी ढोल ताशाच्या निनाद आणि माता भगिनींनी औक्षण करून स्वागत करण्यात आले आमदार देशमुख यांचे स्वागत केले. प्रभाग क्रमांक नऊ हा शहर उत्तर आणि मध्य या दोन्ही मतदारसंघांमध्ये येतो. हा मतदारसंघ 80 ते 90 टक्के भाग संपूर्ण तेलुगु भाषकांचा आहे. तेलगू भाषिक मतदार हे भारतीय जनता पक्षाचे पारंपारिक मतदार असून आमदार विजयकुमार देशमुख यांना एक लाख मतांनी विजय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे भाजपचे दत्तू पोसा आनंद बिरू यांनी सांगितले.

या भागात कष्टकरी वर्ग मोठ्या संख्येने असून केंद्र आणि राज्य शासनाचे सर्वजण चे लाभधारक बहुसंख्येने आहेत. आमदार देशमुख यांना सर्वाधिक मताधिक्य मिळेल असे नागेश सरगम आणि सिद्धार्थ मनजेली यांनी सांगितले.या पदयात्रेत भाजप महिला आघाडी अध्यक्ष विजया वड्डेपल्ली,माजी नगरसेविका रामेश्वरी बिररू, राधिका पोसा, मेघनाथ हेमल, शिवानंद पाटील, शेखर इगे, गंगाधर बंडगर, नागनाथ बापट, नितीन बिच्चल, बजरंग कुलकर्णी, प्रकाश गाजूल, शारदा चरकूपल्ली, अमोल धडके प्रतीक आडम, श्रीनिवास जोगी, नागनाथ पल्लाटी, विमल कन्ना  सहभागी झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button