जिल्हा परिषदसोलापूर

सोलापूर जिल्ह्यातील दिव्यांगांना मिळणार ई- रिक्षा, शेळीगट

जिल्हा परिषदेतर्फे काढण्यात आली वैयक्तिक लाभाच्या योजनेची लॉटरी

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून आज दि. ७ आॕक्टोंबर रोजी २० टक्के मागासवर्गीय कल्याण निधी व ५ टक्के दिव्यांग कल्याण निधीअंतर्गत एकुण ९५० लाभार्थ्यांची सोडत पध्दतीने निवड करण्यात आली.

जिल्हा परिषदेच्या शिवरत्न सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या सोडत कार्यक्रमाप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर व जिल्हा समाजकल्याण अधिकारी अमोल जाधव यांच्यासह विस्तार अधिकारी स्वाती गायकवाड , कनिष्ठ सहाय्यक नानासाहेब लोखंडे आदी कर्मचारी उपस्थित होते.जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून मागासवर्गीयांसाठी शेळीगट,कडबाकुटटी,५ एच पी मोटर, मुले व मुलींना सायकल,ताडपत्री व दिव्यांगांसाठी ई – रिक्षा,शेळीगट या योजनेत सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले होते.यासाठी जिल्हयातुन एकुण ५३९३ अर्ज आले होते.यावेळी अनुदानीत वसतीगृहातील २ मुलांच्याहस्ते तालुकानिहाय उदिदष्टानुसार लाभार्थींचे यादीनुक्रमांकानुसार चिठठया काढून लाभार्थी निवड करण्यात आली आहे.यावेळी नागनाथ शेंडगे, राहुल खटके व इतर लाभार्थींचे समक्ष लाभार्थी निवड करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button