दिवाळी सुट्टीसाठी सोलापूरला मिळणार अनारक्षित विशेष रेल्वे
दिवाळी सणात ऐनवेळी प्रवास करणाऱ्यांची गैरसोय टाळणार

सोलापूर : दिवाळी सणासाठी रेल्वे प्रशासन सोलापूर विभागात दौंड – कलबुर्गी विशेष अनारक्षित ट्रेन चालवणार आहे.
येणाऱ्या सणासुदीच्या काळासाठी प्रवाशांची प्रचंड मागणी लक्षात घेता, प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रसशनाने सोलापूर विभागातून दिवाळी या सणांसाठी उत्सव विशेष ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. तपशील खालीलप्रमाणे आहेतः
गाडी क्र. 01421/01422 दौंड – कलबुर्गी – दौंड अनारक्षित विशेष (21 सेवा)
गाडी क्र. 01421 दौंड – कलबुर्गी अनारक्षित विशेष गाडी दि. 28.10.2024 ते 11.11.2024 पर्यंत आठवड्यातून पाच दिवस (सोमवार, मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार) दौंड रेल्वे स्थानक येथून सकाळी 05.00 वाजता सुटेल तर सोलापूर रेल्वे स्थानकावर 08.40 वाजता येणार आणि 11.20 वाजता कलबुर्गी स्थानक येथे पोहोचेल (11 सेवा).
गाडी क्र. 01422 कलबुर्गी -दौंड अनारक्षित विशेष गाडी दि. 28.10.2024 ते 09.11.2024 पर्यंत आठवड्यातून पाच दिवस (सोमवार, मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार) कलबुर्गी रेल्वे स्थानक येथून संध्याकाळी 04.10 वाजता सुटेल तर सोलापूर रेल्वे स्थानकावर संध्याकाळी 06.40 वाजता येणार आणि रात्री 10.20 वाजता दौंड स्थानक येथे पोहोचेल (10 सेवा).
गाडी क्र. 01425/01426 दौंड – कलबुर्गी – दौंड अनारक्षित विशेष (09 सेवा)
गाडी क्र. 01425 दौंड – कलबुर्गी अनारक्षित विशेष गाडी दि. 31.10.2024 ते 10.11.2024 पर्यंत आठवड्यातून दोन दिवस (गुरुवार आणि रविवार) दौंड रेल्वे स्थानक येथून सकाळी 05.00 वाजता सुटेल तर सोलापूर रेल्वे स्थानकावर 08.40 वाजता येणार आणि 11.20 वाजता कलबुर्गी स्थानक येथे पोहोचेल (04 सेवा).
गाडी क्र. 01426 कलबुर्गी -दौंड अनारक्षित विशेष गाडी दि. 27.10.2024 ते 10.11.2024 पर्यंत आठवड्यातून दोन दिवस (गुरुवार आणि रविवार) कलबुर्गी रेल्वे स्थानक येथून संध्याकाळी 08.30 वाजता सुटेल तर सोलापूर रेल्वे स्थानकावर रात्री 10.55 वाजता येणार आणि मध्य रात्री 02.30 वाजता दौंड स्थानक येथे पोहोचेल (05 सेवा).
थांबे: दौंड, भिगवण, पारेवाडी, जेऊर, केम, कुर्डूवाडी, माढा, मोहोळ, सोलापूर, टिकेकरवाडी, होटगी, अक्कलकोट रोड, बोरोती, दुधनी, गाणगापूर आणि कलबुर्गी असे असतील.संरचना: 10 अनारक्षित 2 गार्ड्स ब्रेक व्हॅन. एकूण 12 कोच असतील.
या विशेष ट्रेनच्या थांब्यांच्या तपशीलवार माहितीसाठी कृपया http://www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा.प्रवाशांनी या दिवाळी विशेष अनारक्षित रेल्वे सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील यांनी केले आहे.
सातत्याने केला पाठपुरावा….
दौण्ड -कलबुर्गी – दौण्ड ही रेल्वे सुरू झाल्याने ग्रामिण विभागातील विद्यार्थी, व्यापारी, नौकरदार, भाजीवाले, जेवणाचे डबेवाले, सोलापूर जिल्हा मुख्यालयास वैद्यकीय उपचार घेण्यासाठी जाणारे रुग्ण तसेच अक्कलकोट व गाणगापूर येथे जाणारे भाविक यांची प्रवासातील गैरसोय दूर झालेली आहे. ही रेल्वे कायमस्वरूपी होण्यासाठी प्रवासी सेवा संघ रेल्वे प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू करणार आहे.
संजय पाटील,
अध्यक्ष, प्रवासी सेवा संघ सोलापूर