कास्ट्राईबचे अरुण क्षीरसागर यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान

सोलापूर : भारतीय संविधान सन्मान अमृतमोत्सवी वर्षानिमित्त कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य सांगली शाखेतर्फे आयोजित विभागीय मेळाव्यामध्ये कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण क्षिरसागर यांना त्यांच्या संघटनेतील आजवरच्या योगदानाबद्दल व सामाजिक कार्याबद्दल जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कवी व लेखक नितिन चंदनशिवे, कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे कार्याध्यक्ष गणेश मडावी, महासचिव सुरेश तांबे, वरिष्ठ उपाध्यक्ष सुमित भुईगळ, राज्य उपाध्यक्ष गिरीष जाधव यांच्याहस्ते गौरवपत्र, सन्मानचिन्ह, शाल व संविधान पुस्तकेची प्रत देवून क्षीरसागर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यापूर्वी अरुण क्षिरसागर यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.याप्रसंगी महासंघाचे अतिरिक्त सरचिटणिस अशोक गोडबोले, सरचिटणीस सतिश कांबळे, सोलापूर महासंघाचे अध्यक्ष मनीष सुरवसे, जि. प. शाखेचे चंद्रकांत होळकर, भगवान चव्हाण, कल्याण श्रावस्ती, नागनाथ धोत्रे, मकरंद बनसोडे, भिमाशंकर कोळी, दिपक चव्हाण, विजय हराळे, विलास पाटील, उदय सोनकांबळे, यासिन यादगिर, राजू राठोड आदी संघटना पदाधिकारी, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.