सिद्धेश्वरपार्कमध्ये चित्र रंगविण्यात रमली चिमुकले
जागतिक महिला दिनानिमित्त विश्वशांती गुरुकुलतर्फे भगिनींचा सन्मान

सोलापूर : जागतिक महिला दिनानिमित्त एमआयटी पुण्याच्या विश्वशांती गुरुकुल स्कूलतर्फे जुळे सोलापुरातील सिद्धेश्वर पार्क मध्ये घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत निसर्ग चित्र रंगवण्यात चिमुकले गुंग झाले. यावेळी सिद्धेश्वर पार्कच्या महिला सदस्यांचा सन्मान करण्यात आला.
एमआयटीच्या विश्वशांती गुरुकुल स्कूल तर्फे सिद्धेश्वर पार्कमधील शिव मंदिरात चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यात लहान गटासाठी निसर्ग चित्र रंगवणे तर मोठ्या गटासाठी निसर्ग चित्र काढण्याची स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत सिद्धेश्वर पार्क व परिसरातील चिमुकल्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. प्रारंभी गुरुकुलचे कॉर्डिनेटर अजय शिवशरण यांनी प्रास्ताविक केले. विश्वशांती गुरुकुलमध्ये एप्रिलपर्यंत महिलांसाठी लगोरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सोलापूर शहरातील प्रत्येक सोसायटीच्या महिला ग्रुपने सहभाग नोंदवावा असे आवाहन केले. महिला दिनाच्या औचित्य साधून याप्रसंगी सोसायटीच्या सदस्य मीनाक्षी हावशेट्टी, ज्योती विजापुरे, धनश्री सरसंबी,रूपाली नवले, वैशाली डोंबाळे, रत्नमाला भोसले यांचा सन्मान करण्यात आला. स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांना यावेळी प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गुरुकुलचे कॉर्डिनेटर अक्षय घाडगे, शिक्षिका स्वाती सोनवणे, मधुरा बेत, कर्मचारी सुशीला साळे, सिद्धेश्वर पार्कचे चेअरमन गुरान्ना हावशेट्टी, विजापुरे सर, सरसंबी सर, भोसले सर, राजकुमार सारोळे, मुख्याध्यापक स्वामी यांनी परिश्रम घेतले. शेवटी डोंबाळे सर यांनी आभार मानले.