सोलापूरनिवडणूकराजकीय

कोठे यांच्या नातवाने केली स्वप्नपूर्ती

सोलापूर : स्व. विष्णुपंत कोठे हे काँग्रेसचे निष्ठावंत नेते होते. त्यांनी काँग्रेसच्या अनेक निवडणुका यशस्वी केल्या. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना निष्ठेने साथ दिली. आपला मुलगा आमदार व्हावा असे त्यांचे स्वप्न होते. पण काँग्रेसने त्यांच्या निष्ठेचे कदर केली नाही. वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महेश कोठे यांनी तीन वेळा वेगवेगळ्या पक्षांकडून निवडणूक लढवली पण त्यात त्यांना यश आले नाही. पण नातू देवेंद्र कोठे यांनी भाजपमध्ये प्रवेश करून  सोलापूर शहर मध्य ची निवडणूक लढवली आणि काँग्रेसचा बालेकिल्लाच त्यांनी सर केला व आजोबांची स्वप्नपूर्ती त्यांनी केली. तसेच कोठे घराण्यातील पहिला आमदार होण्याचा मानही त्यांनी मिळवला.

सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून यापूर्वी काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी आमदारकी कायम राखली होती. लोकसभेच्या खासदार झाल्यानंतर त्यांचे वारसदार कोण ठरणार यामध्ये काँग्रेसमध्ये चुरस निर्माण झाली. ऐनवेळी काँग्रेसने शहराध्यक्ष चेतन नरोटे यांना संधी दिली पण नरोटे यांना काँग्रेसचा हा गड राखता आला नाही. भाजपच्या देवेंद्र कोठे यांनी पहिल्याच प्रयत्नात जोरदार मुसंडी मारली  आणि प्रणिती शिंदे यांच्या मताधिक्यापेक्षा जास्त मताधिक्य मिळवले. देवेंद्र यांच्या या विजयाने अनेक गणित चर्चेत आली आहेत. त्यात कोठे घराण्याचा इतिहास महत्त्वाचा आहे. त्यांचे आजोबा स्व. विष्णुपंत कोठे  काँग्रेसचे निष्ठावान होते. पण काँग्रेसने त्यांचे कदर केली नाही. त्यांना विधान परिषदेचे आमदार करावे म्हणून त्यांचे चिरंजीव महेश कोठे यांनी काँग्रेसच्या नेत्यांकडे लकडा लावला. पण काँग्रेसच्या नेत्यांनी ऐनवेळी दुसऱ्याच नावाची शिफारस केली. त्यामुळे नाराज झालेल्या महेश कोठे यांनी काँग्रेसची साथ सोडली. आमदारकीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवसेना  राष्ट्रवादी, राष्ट्रवादी शरद पवार गट असा त्यांनी राजकीय प्रवास केला. पण त्यात त्यांना यश आले नाही. पण त्यांचे पुतणे देवेंद्र कोठे यांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर सेनेचा भगवा झेंडा त्यांनी हाती घेतला. नगरसेवक झाल्यानंतर त्यांनी आपल्या प्रभागातील अनेक विकास कामे यशस्वी केली.पण महाविकास आघाडी अस्तित्वात आल्यानंतर बरीच राजकीय उलथापालच झाली. लोकसभा निवडणुकीच्या वेळेस त्यांनी ऐनवेळी भाजपचा रस्ता धरला आणि त्यांचा हा निर्णय पथ्यावर पडला. भाजपने त्यांना विधानसभेसाठी सोलापूर शहर मध्य मधून तिकीट दिले. अन पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाले आणि आजोबाचे स्वप्न पूर्ण झाले. काका महेश कोठे यांचा शहर उत्तर मधून पराभव झाला तर इकडे शहर मध्य मधून पुतण्या देवेंद्र कोठे विधानसभेत गेले. माढा व करमाळा मतदार संघात मात्र वेगळी परिस्थिती राहिली. काका माजी आमदार बबनदादा शिंदे  यांचे चिरंजीव रणजीतसिंह व माजी आमदार संजयमामा शिंदे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. सोलापूर शहर मध्य व करमाळा मतदार संघातील उमेदवाराला मिळालेली मते खालील प्रमाणे आहेत.

सोलापूर शहर मध्य…

देवेंद्र कोठे : 109195

फारूक शाब्दि : 60790

चेतन नरोटे  : 16092

नरसाया आडम : 6749

श्रीनिवास संगेपांग : 1552

तौफिक शेख : 961

सुभाष गायकवाड : 607

एम. डी. शेख : 511

रवी म्हेत्रे  : 371

मनीष गायकवाड : 346

खीजर पीरजादे : 244

मनीष कोमटी : 240

संदीप आडके : 230

रोहित मोरे : 197

दत्ता थोरात : 193

योगेश शीडगणे : 182

रविकांत बनसोडे : 141

देविदास दुपारगुडे : 104

प्रदीप सर्जन  : 86

विक्रम कसबे  : 85

करमाळा…

नारायण पाटील : 96012

संजयमामा शिंदे : 80006

दिग्विजय बागल : 40834

अभिमन्यू अवचर : 4791

जमीर शेख : 218

सिद्धाराम वाघमारे : 585

रामदास झोळ : 4791

जालिंदर कांबळे : 216

अशोक वाघमारे : 3962

मधुकर मिसाळ : 122

संजय शिंदे : 1525

धीरज कोळेकर : 310

विनोद सीतापुरे : 684

गणेश भानवसे : 82

संजय शिंदे : 629

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button